Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०
उस्मानाबादच्या पालकमंत्र्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश..!
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.11 जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री आ.शंकरराव यशवंतराव गडाख,महाराष्ट्राचे मृदा व जलसंधारण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत.
क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या तिकिटावर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत,त्यांनी आज मातोश्री निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन जाहीररित्या शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी शिवसेनानेते मिलिंदजी नार्वेकर उपस्थितीत होते.
पक्ष प्रवेशानंतर ट्विटरवर ते म्हणाले,
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, उद्योग व्यवसाय, बेरोजगार तरुण तसेच समाजातील विविध घटकासाठी चांगले निर्णय घेतले असून राज्यवरील करोनाच्या संकट काळात मोठ्या हिमतीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले आहे. माझ्या वडिलांचा व हिंदूह्र्दय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहाचे संबंध होते. गेल्या 10 वर्षात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या बरोबर अनेकदा संबंध आला म्हणून मी आज शिवसेना पक्षात प्रवेश करत असून त्यांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकत मंत्रिपदाची संधी दिली. त्या विश्वासाला पात्र राहून सर्व सामान्य जनतेसाठी काम करणार आहे व शिवसेना वाढिसाठी झटणार आहे. शिवसेना हा पक्ष शेतकरी, कष्टकरी तसेच सर्व सामान्य जनता यांच्या बरोबर असून शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग यात पक्षाचे मोठे काम आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना नेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आता शंकरराव गडाख यांच्यावर या जिल्ह्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा