Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये जामनेर नगर परिषदेने मिळविला, राज्यात १४ वा क्रमांक..!



जामनेर: प्रतिनिधी संजय सूर्यवंशी 
जामनेर नगरपरिषदे मार्फत वेळोवेळी राबवीण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेत महाराष्ट्र राज्यामधील सन २०२० मधील सर्वेक्षणामधे जामनेर पालीकेने १४ वा क्रमांक मिळाल्याची माहिती येथील नगराध्यक्षा सौ.साधना महाजन यांनी पत्रकार परीषदेमधे दिली.विशेष म्हणजे देशातील पाच राज्याच्या पश्चिम झोनमधील सुमारे ३०० शहराच्या सर्वेक्षण स्पर्धेतही १५ वा क्रमांक मिळविला असुन या झोनमधे गोवा,महाराष्ट्र,गुजरात,मध्यप्रदेश,राजस्थान या राज्यांचा समावेश होता.तसेच नाशिक विभागात २५ ते ५० हजार लोकसंख्येच्या शहरांमध्ये तिसरा क्रमांक मिळवला आहे. 

शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी पालीकेच्या वतीने राबवीण्यात आलेल्या योजनांना शहरवासीय व पालीका कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले,तसेच यापुढेही आपण सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा असुन त्या माध्यमातुन स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात नंबर एक कडे वाटचाल  निश्चितच करू अशी ही भावना नगराध्यक्षा सौ.साधना महाजन यांनी यावेळी पत्रकार परीषदेत व्यक्त केली. 

निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परीषदेला उपनगराध्यक्ष अनीस शेख ,नगरपालिकेचे मुख्याधीकारी राहुल पाटील, गटनेते डॉ प्रशांत भोंडे, शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक महेंद्र बावीस्कर,कैलास नरवाडे,आतीष झाल्टे,भाजपचे सरचिटणीस रवींद्र झाल्टे, स्वियसहायक दिपक तायडे,संतोष बारी,सदाशीव शिंदे आदी उपस्थीत होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध