Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
केळी वर दुहेरी संकट...सी एम.व्ही व्हायरस करपा..! करपा व चरका निर्मूलनाची औषधी मोफत द्या,-- विलास ताठे यांची मागणी..!
केळी वर दुहेरी संकट...सी एम.व्ही व्हायरस करपा..! करपा व चरका निर्मूलनाची औषधी मोफत द्या,-- विलास ताठे यांची मागणी..!
प्रतिनिधी रावेर अजीज शेख रावेर तालुक्यातील केळी उत्पादक
शेतकरी बांधव सध्याच्या परिस्थितीत "CMV" (कुकुंबर मोझ्याक व्हायरस) या रोगाचा प्रादुर्भाव केळी च्या
झाडावर दिसायला सुरवात झाली आहे. कारण या रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींच्या वाढीसाठी सध्याचे वातावरण पोषक असल्यामुळे या रोगा चा प्रसार होऊ शकतो.तरी या रोगाचे नियंत्रण/व्यवस्थापन करण्याचें अत्यंत गरजेचे झाले आहे,कारण मागच्या वर्षी सुध्दा मोठ्या प्रमाणात केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या फडका बसला आहे,ह्या रोगाचा प्रसार हा रसशोषण करणारे कीड- -मावा,तुडतुडे,थ्रीप्स,पांढरी माशी (व्हाईट फ्लाय) इ किडी मार्फत तनातून(होस्ट)/एका झाडातून दुसऱ्या झाडात या रोगाचा प्रसार हातो.
या उपाय म्हणून सर्वप्रथम रोगग्रस्त केळी झाड खोदून नष्ट करावे.
केळी बाग तण मुक्तठेवावे -- बागेत किंवा शेतीच्या बांधावरील सर्व होस्ट/ तण काढून टाकणे.( केना, चिव्वळ, घोळ इ गवंतांमध्ये बांधावरील जंगली कारल्याचे वेल या वर हा रोग 365 दिवस अस्थितत्वात असतो )
केळी बागेत किंवा बांधवर्ती कोणतेही वेलवर्गीय पीक
(काकडी,गिलकी,वाल,दोडकी, दुधीभोळा,गंगाफळ,चवळी,कारले इत्यादी) तसेच
मिरची सारखी पिके/ भाजीपाला लावू नये.
रोगाच्या नियंत्रणासाठी
8-8 दिवसांच्या अंतराने केळीवर फवारणी करवी, बागेच्या बांधवरसुध्दा फवारणी करवी.
तसेच
इमिडक्लोप्रिड-(इमिडा/कॉन्फिडॉर)10मिली
किंवा
एसिटामिप्रिड--(टाटामाणिक) 8 ग्राम
किंवा
थायोमिथोक्झाम -(अक्ट।रा)5 ग्राम
किंवा
प्रोफेनोफॉस--20 मिली
किंवा
फ्लूबेंडामाइड -(फेम)- 5 मिली
किंवा
फ्लोनिक्यामाइड -(उलाला)- 8 ग्राम
वरील पैकी एक आणि त्यामध्ये,
असिफेट पावडर -- 10 ग्रॅम आणि
++
निंबोळी अर्क --30 मिली
प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे.
वरील औषध आलटून पालटून घ्यावे.
करपा सुध्दा मोठ्या प्रमाणात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेला आहे,कारण मागें केंद्रात आणि राज्यातही आघाडी सरकार होते, यावेळी खासदार केंद्रीय कुषी मंत्री शरद चंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी वरील करपा चरका निर्मूलनासाठी मोफत स्थानिक पातळीवर पंचायत समिती,कुषी अधिकारी कार्यालयातून मेन्कोझेंब, कार्बन डिझम,ऑसिफेड सह अनेक बुरशीनाशक नाशके, किटकनाशके औषधींचा पुरवठा होत होता,पण मागच्या काळात महायुती चे सरकार केंद्रात आणि राज्यात आलं व त्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री
शरद चंद्र पवार यांनी दिलेली केळी करपा व चरका निर्मूलनासाठी मोफत औषधी पुरवठा हि सवलत बंद करून,एक प्रकारे केळी उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी केली, यामुळे दरवर्षी केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या खर्चिक बाबी ला केळी करपा व चरका निर्मूलनासाठी समोर जावे लागत आहे,.. परिणामी शेतकऱ्यांचा उत्पादक खर्चातही मोठी भर पडत असल्याने बरेच शेतकरी हवाल दिल आहे त,
पण आता महाराष्ट्र राज्यांत महाविकास आघाडी चे सरकार आले आहे,तर पुन्हा राज्य सभेवर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची वर्णी लागली आहे,तर केळी उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा शरद पवारांकडून मदतीची अपेक्षा आहे,कि, केळी वरील करपा व चरका निर्मूलनासाठी मोफत औषधी पुरवठा पुन्हा कार्यान्वित करण्यात यावा, कारण महाराष्ट्र राज्यांचे सरकार , मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सुध्दा तयांचा सल्ला घेत असतात, म्हणून स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, पालकमंत्री यांनी आग्रही भूमिका घेतल्यास केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या दिलासा मिळू शकतो,व त्यांचा केळी उत्पादक खर्चातही कपात होवून, केळी उत्पादक शेतकरी प्रती महाविकास आघाडी चे सरकार संवेदनशील आहे,यांची जनमानसात भावना रुजू शकते,व केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळू,ते सुखावले जाऊ शकतात,
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
दिंडोरी प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील प्रा.उपकेंद्रात जन आरोग्य समितीची बैठक नुकतीच पार पडली. पार पड...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा