Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
प्रतिबंधित क्षेत्रात सार्वजनिक गणेशोत्सवा बाबत तहसील कार्यालय परंडा यांचे आदेश..!
प्रतिबंधित क्षेत्रात सार्वजनिक गणेशोत्सवा बाबत तहसील कार्यालय परंडा यांचे आदेश..!
परंडा (राहूल शिंदे) दि.20 महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणू आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा 1987
दि.20/3/2020पासून लागू करून खंड 2,3,4मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गुमित केलेली आहे.त्याअन्वये उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता करिता कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे.
त्या अर्थी कंटेनमेंट झोनमधील इतर नागरिकांना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व उपाययोजना अतीकटाक्षाने करण्याच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत.कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तालुक्यातील 19 कंटेनमेंट झोनमध्ये यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा नकरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
यामध्ये पवार गल्ली सिरसव, सिरसव,पाचपिंपळा,कपिलापुरी,शेवाळेवस्ती-कासार गल्ली-माणिकनगर-तेल्याची वस्ती शेळगाव,पांढरेवाडी,बोराडे गल्ली कात्राबाद,नरसिंग गल्ली वाकडी, पाटील गल्ली साकत बु. ,सुतार गल्ली कांडारी,पालकी रोड कंडारी,खासगाव, दळवीवस्ती अलेश्वर,
आवरपिंपरी,ढगपिंपरी,देवगाव वडनेर, देवगाव खुर्द,पिस्तमवाडी, बाजार कट्टा डोंजा,कुंभेफळ,रुई
तरी संबंधीत गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी व मंडळांच्या अध्यक्षांनी आपल्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करू नये.शांतता व सुव्यवस्था टिकवून ठेवावी.असे परिपत्रक तालुक्याचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्री.अनिलकुमार हेळकर यांनी काढलेले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
दिंडोरी प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील प्रा.उपकेंद्रात जन आरोग्य समितीची बैठक नुकतीच पार पडली. पार पड...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा