Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

निंभोरा येथे समस्यांच्या बाबत उपसरपंच यांना घेराव..! सर्वच प्रमुख रस्त्यात चिखलयुक्त दलदल..!



निंभोरा बु .ता रावेर येथील वार्ड क्रमांक 6  हा विस्ताराने मोठा आहे  विविध  गल्ली बोळासह रस्त्यात सलग संततधार पावसामुळे सर्वत्र चिखल व दलदल असल्यामुळे येथील रहिवाशी त्रस्त झाले असून त्यांनी 14 व्या वित्त आयोगातून गावात विविध ठिकाणी अनेक कामे सुरू असून अत्यंत गरजेचे व महत्वचे आरोग्याशी निगडित प्रश्‍नांकडे ही ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष द्यावे व वार्डातील गावातील विविध रस्त्यांची दुर्दशा झाली असून तिला सोडवावी व  कोरोना यासारख्या जागतिक महामारी मध्ये जिव्हाळ्याच्या व आवश्यक अशा या चिखलीच्या दलदला पासून सुटका करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. 

यावेळी वार्डातील महिला तसेच नागरिकांनी उपसरपंच यांच्या घरी घेराव घालत विचारणा केली असता व विविध प्रश्नांची सरबत्ती केली. याप्रसंगी त्यांनी  सुकी नदीला पूर असल्याने तो ओसरल्यावर खरवा गिट्टी लवकरच टाकली जाईल व या समस्येवर तोडगा निघेल एक-दोन दिवसात काम सुरू होऊन अपेक्षित कामे सुरू होतील उपसरपंच सुभाष महाराज पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध