Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

कुरखळी फाट्या नजीक अज्ञात वाहनांच्या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी.. !




मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत मोटरसायकल चालक विनोद देशमुख गंभीर जखमी झाल्याची घटना संध्याकाळी ७  वाजेच्या सुमारास कुरखळी फाट्याजवळ एच पी पेट्रोल पंम्पाजवळ घडली आहे.
     
शिंदखेडा तालुक्यातील पाष्टे येथील विनोद भास्कर देशमुख हे हिसाळे ता शिरपूर येथे आरोग्यसेवक म्हणून नियुक्त होते. 

ड्युटीवरून मोटरसायकली वरून घरी जात असतांना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कुरखळी फाट्या नजिक अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला. 

मोटरसायकल चालक विनोद देशमुख हे गंभीर जखमी झाले. 

रुग्णवाहीकेच्या मदतीने जखमीअवस्थेत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपजिल्हा रुग्णालयात कोविड-१९ चे पेशन्ट असल्याने त्यांना सद्गुरू हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आहे.



1 टिप्पणी:

प्रसिद्ध