Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
तहसिलदार शिरपूर यांचाकडे मागणी मुग पीकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी..!
तहसिलदार शिरपूर यांचाकडे मागणी मुग पीकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी..!
शिरपूर : यावर्षी वेळेवर पर्जन्यवृष्टी झाल्याने शिरपूर तालुक्यातील शेतकर्यांची पेरणी वेळेत झाली असुन पिके जोमात आलेली आहेत. असे असतांना तालुक्यातील अनेक गावातील मुग या पिकावर अती वृष्टीमुळे शेतकर्यांच्या मुग पीकांचे संपुर्णपणे नुकसान झाले आहे.
त्यामुळे मुगाने बहरलेलु, हाताशी आलेली पिके गेल्याने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असुन मुग पिकाचे नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी शिरपूर भाजपा तर्फे माजी मंत्री अमरीशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचा मार्गदर्शनाखाली तहसिलदार शिरपूर यांना देण्यात आले आहे. पिके चांगली आल्याने जास्तीच्या उत्पन्नाची अपेक्षा असलेला मुग उत्पादक शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे अतिशय निराश झाले असुन तालुक्यातील शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बर्याच वर्षापासुन मुग या पीकाचे चांगले उत्पन्न यावर्षी येणार होते.
अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे संपुर्णपणे पीकाचे नुकसान झाले आहे.
असे निवेदन भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी यांनी (दि.२० आॅगस्ट) रोजी तहसिलदार आबा महाजन यांना दिले आहे. निवेदनात नमुद केले आहे कि नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तलाठी, सर्कल व कृषी अधिकारी यांना सदरील मुग पीकांचे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे अदेश आपल्या स्तरावरुन देण्यात यावेत. व याबाबत शासनाकडे पाठपुरावा करुन या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी हि शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी यांनी शिरपूर तहसिलदार आबा महाजन यांच्याकडे केली आहे.
निवेदनाची प्रत विधान सभा विरोधी पक्षनेते ना देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री ना. दादाजी भुसे, धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांना हि पाठवण्यात आल्या आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
दिंडोरी प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील प्रा.उपकेंद्रात जन आरोग्य समितीची बैठक नुकतीच पार पडली. पार पड...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा