Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
व्यवसाय सुरु करत आहात? तर खालील काही बाबी लक्षात असु द्या..! संकलन श्री नितीनभोई, पारोळा..!
व्यवसाय सुरु करत आहात? तर खालील काही बाबी लक्षात असु द्या..! संकलन श्री नितीनभोई, पारोळा..!
पारोळा प्रतिनिधी: समाज मन हो, तुम्हाला यशस्वी व्यवसायिक व्हायचे असेल तर किमान खालील बाबीं ह्या आपल्याजवळ असु द्या.
१) वेळ: तुम्ही व्यवसायाला पुरेसा वेळ देऊ शकत असाल तरच व्यवसाय सुरु करा.
२) एकाच ठिकाणी १८ तास काम करण्याची तयारी: एकाच ठिकाणी दिवसातील १८ तासांपेक्षाही जास्त वेळ काम करण्याची तयारी हवी.
व्यवसायात काही वेळेस अशा घटना घडतात कि तुम्हाला त्यासाठी तहान भूक विसरून तासंतास काम करत राहावे लागते.
३) ग्रहणक्षमता, संवादकौशल्य: तुमच्यात उत्तम ग्रहणक्षमता असणे आवश्यक आहे. कमी बोलणे आणि जास्त ऐकणे हे उत्कृष्ट संवाद कौशल्याचे गमक आहे.
४) रागावर नियंत्रण: यशस्वी व्यवसायासाठी तुमचे स्वतःच्या रागावर नियंत्रण असणे आवश्यक आहे.
५) आळस नसावा:कोणत्याही कामासाठी आळस नसावा. कंटाळा आला म्हणून एखादे काम पुढे ढकलणे हे व्यवसायाला ओहोटी लावते.
६) नुकसानीची मानसिकता: व्यवसायात नुकसान होतंच असते त्यामुळे नुकसान झाले म्हणून खचून जाऊ नये. नुकसानाला खंबीरपणे सामोरे जाण्याची तयारी हवी.
७) आत्मविश्वास: यशस्वी व्यवसायासाठी आत्मविश्वास आवश्यक असतो. कोणत्याही बाबीत नकारात्मकता तुम्हाला स्पर्धेमधे पिछाडीवर नेतो.
८) न्यूनगंड: न्यूनगंड हे व्यवसायातील अपयशाचे सर्वात मोठे कारण आहे. कोणत्याही गोष्टींमधे स्वतःला कमी समजने हे तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम कार्यापासून परावृत्त करते. न्यूनगंडापासून वेळीच लांब जाणे व्यवसायासाठी आवश्यक असते.
९) संयम: संयम असेल तर तुम्ही कठिणातील कठिण प्रश्न मार्गी लावु शकता. परिस्थीती कशीही असली तरिही कोणत्याही परिस्थितीत संयम न गमावणारा यशस्वी होतोच.
१०) स्व प्रतिमा: तुमच्या वैयक्तीक प्रतिमेचा तुमच्या व्यवसायावर परिणाम होत असतो, त्यामुळे तुमची समाजातील प्रतिमा कधीही बिघडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे विश्वास ठेवा यश तुमचेच असेल. उद्योजक व्हा, समृध्द व्हा, यशवंत व्हा,किर्तीवंत व्हा.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
दिंडोरी प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील प्रा.उपकेंद्रात जन आरोग्य समितीची बैठक नुकतीच पार पडली. पार पड...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा