Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी पदावर श्री.कस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती तर श्रीमती दीपा मुंडे लातूर मनपा आयुक्त..!



उस्मानाबाद(राहूल शिंदे) दि.20  उस्मानाबादचे नूतनजिल्हाधिकारी म्हणून पुणे येथील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक श्री.कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे अप्पर मुख्य सचिव श्री.सीताराम कुंटे यांनी आज गुरुवारी आदेश दिले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी श्रीमती. दीपा मुधोळ-मुंडे यांची लातूरला महापालिका आयुक्त म्हणून  बदली झाली आहे.

उस्मानाबादचे नवनियुक्त जिल्हाधिकारी श्री.कौस्तुभ दिवेगावकर हे 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी ते पुणे येथील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या संचालक पदी कार्यरत होते.

उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी डॉ. दीपा मुधोळ-मुंडे यांच्या जागी कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली असून सध्याचा पदाचा कार्यभार अप्पर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिका-याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार श्रीमती मुधोळ मुंडे यांच्याकडून स्विकारण्याचे आदेशित केले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध