Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०
परंडा तालुक्याला खरीप हंगाम 2019साठी 24कोटी 89लाख रु निधी मंजूर..!
उस्मानाबाद (राहूल शिंदे)दि.20 जिल्ह्यातील परंडा तालुका खरिप-2019 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना अनुदान मंजूर
खरीप हंगाम 2019 मध्ये परंडा तालुक्यातील 96 गावांत पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. शेतकऱ्यांनचा खरिप हंगाम वाया गेला. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. पेरणी न झालेल्या क्षेत्रांचे पंचनामे झाले होते.
नंतर अवेळी झालेली पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान मिळाले परंतु पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित होते. माजी जलसंधारण मंत्री विद्यमान आमदार प्रा.तानाजीराव सावंत साहेब यांच्या समवेत त्याअनुषंगाने मदत व पुनर्वसन सचिव मा.किशोर राजेनिंबाळकर साहेब यांच्या कडे वेळोवेळी भेटून सातत्याने पाठपुरावा चालू होता.
या पाठपुराव्याने तालुक्यातील 96 गावातील 35612 हेक्टर वरिल क्षेत्रावरील पिकांसाठी 24 कोटी 89 लाख मंजूर झाला आहे. ही मदत बाधित शेतकऱ्यांना 2 हेक्टर मर्यादित असून तालुक्यातील बागायती क्षेत्र 602 हेक्टर आहे. प्रति हेक्टर 18000/- व जिरायती क्षेत्र 35010 हेक्टर. आहे. प्रति हेक्टर 6800/- मिळणार असून 26 ऑगस्ट नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील.अशी माहिती जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर साहेब यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटद्वारे दिली आहे.
या शासनाच्या निर्णयाबद्दल तालुक्यातील शेतकरी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे व समाधान व्यक्त होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...

👍👍👍
उत्तर द्याहटवा