Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०
राममंदिर भूमिपूजनाचे औचित्य साधून कारसेवकांचा सत्कार..!
आज अयोध्या येथील श्रीराम जन्म भुमित प्रभु श्री रामचंद्रांच्या भव्य मंदिराच्या भुमीपुजनाचा कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. गेल्या अनेक दशकाचा प्रलंबित राममंदिराचा प्रश्न सुटला, राममंदिर निर्माणासाठी अनेक वर्ष संघर्ष करावा लागला ज्यामध्ये कारसेवकांनी योगदान आणि बलिदान दिले त्यामुळेच आज हा ऐतिहासिक दिवस पाहायला मिळत आहे.
अयोध्येला कारसेवेसाठी अनेक कारसेवक गेले होते त्यापैकी शहरातील मल्लिनाथ गायकवाड, मुकुंद नाईक, यशवंत बेले, रंगनाथ गायकवाड (बाबू टेलर), राजेश कुलकर्णी, सुभाष कांबळे, राहुल वेदपाठक, मुकुंद वैद्य आदी कारसेवकांचा समावेश होतो.
कारसेवकांच्या योगदानामुळे आज मंदिरनिर्माणाचे कार्य सुरू झाले यामुळे कृतज्ञता व्यक्त करत उपस्थित कारसेवक मल्लिनाथ गायकवाड, मुकुंद नाईक, यशवंत बेले, रंगनाथ गायकवाड (बाबू टेलर) यांचा सत्कार करण्यात आला तसेच सुभाष कांबळे यांच्या घरी भेट देऊन किराणा मालाचे किट देण्यात आले यावेळी जेष्ठ पत्रकार विलासजी येडगे,सुधीरजी पोतदार, माजी युवा सेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर घोडके, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्रमीक पोतदार, भाजप सरचिटणीस विशाल सर डुकरे, ग्राहक स्वरंक्षक ताः प्रमुख राजेद्र मैजर जाधव, महेश वाघमारे आदि उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा