Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०
ऑगस्टचा पगार सीएमपी वेतन प्रणालीद्वारे होणार...!
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.27
जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेच्या मागणीला यश.मा.ना.बच्चूभाऊ कडू राज्यमंत्री शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांचे कडे सीएमपी वेतन प्रणालीद्वारे जालना जिल्हा परिषदच्या धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रात सीएमपीने वेतन व्हावे ही मागणी केली होती.
महाराष्ट्रात जालना जिल्हा परिषदेने सीएमपी वेतन प्रणालीद्वारे शिक्षकांचे वेतन कॅफो टू डायरेक्ट शिक्षकांचे खातेवर जमा करून वेतना बाबत जागरुक,सजग राहून अग्रेसर राहण्याचा बहुमान मिळवला.
त्याच धर्तीवर उस्मानाबाद जिल्ह्यात देखील सीएमपी वेतन प्रणालीद्वारे शिक्षकांचा पगार व्हावा यादृष्टीने प्रथम प्रहार शिक्षक संघटनेने पावले उचलली;या कामी १२ फेब्रुवारी २०२० रोजी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.अस्मिताताई कांबळे,मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांची भेट घेऊन सीएमपी वेतन प्रणाली म्हणजे काय आणि त्यामुळे शिक्षकांचा पगार लवकर होण्यास कशी मदत होईल या बाबी सविस्तर चर्चिल्या गेल्या होत्या.
या प्रणालीमुळे शिक्षकांचे पगाराला विलंब होणार नाही त्यामुळे कमीतकमी शिक्षकांचा पगार दरमहा ५ तारखेपर्यंत होऊन शिक्षक आनंदी राहतील आणि आपल्या उस्मानाबाद जिल्हाचा एक आदर्श इतर जिल्हयापुढे जाईल तसेच आपल्या कार्य कालात हा निर्णय झाल्यास एक इतिहास होईल यावर अध्यक्षा कांबळे मॅडम व मुख्य कार्यकारी अधिकारी कोलते यांनी अगदी सकारात्मक भूमिका घेऊन पुढील सहा महिन्यात सीएमपी वेतन प्रणाली द्वारे जिल्हा परिषद शिक्षकांचा पगार करण्याचा शब्दच त्यांनी प्रहार शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाला दिला होता तोच शब्द जि.प. अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अखेर खरा ठरवला.
सीएमपी वेतन प्रणाली द्वारे शिक्षकांचे वेतन करणेकामी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती धनंजय सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते,मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे साहेब, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले, उप लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे साहेब, तत्कालीन शिक्षणाधिकारी (प्रा.) गजानन सुसर,रोहिणी कुंभार, विद्यमान शिक्षणाधिकारी रामलिंग काळे,अर्थ विभाग धोंगडे साहेब,जिल्हा शालार्थ विभाग प्रमुख बिठुबाई क्षीरसागर मॅडम तसेच जिल्ह्यातील सर्व मास्टर ट्रेनर्स यांनी खुपच परिश्रम घेतले व सीएमपी वेतन प्रणालीला प्रथम प्राधान्य दिल्यानेच माहे ऑगस्ट २०२० चे वेतन सीएमपी वेतन प्रणाली द्वारे होत आहे.
या बद्दल प्रहार परिवार उस्मानाबाद च्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक कौतुक, कृतज्ञतेसह स-हदय आभार.
सीएमपी वेतन प्रणाली द्वारे शिक्षकांचे वेतन व्हावे यासाठी प्रहार शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत, जिल्हा समन्वयक दत्तात्रय पुरी,सचिव दत्तात्रय राठोड,कार्याध्यक्ष विशाल अंधारे,कोषाध्यक्ष रघुनाथ दैन,साहेब पवार, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज शेख, अरिफ शेख,हनुमंत माने,जिल्हा नेते संतूकश कडमपल्ले,धनंजय आंधळे,योगेश चाळक,धम्मदिप सवाई,महिला प्रमुख सुषमा सांगळे वनवे, ज्योती देशमुख,गणेश गोरे,गोविंद तापडे,भास्कर कांबळे परंडा तालुका अध्यक्ष विनोद सुरवसे,उपाध्यक्ष शहाजी झगडे आदि.पदाधिकारी यांनी चिकाटीने सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळेच हे यश मिळाले अशी माहिती जिल्हा अध्यक्ष वैजिनाथ सावंत यांनी दिली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

खूपच छान
उत्तर द्याहटवा