Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १६ ऑगस्ट, २०२०
विश्व जन आरोग्य सेवा समितीच्या वतीने महारक्तदान शिबीर संपन्न...!
भूम(राहूल शिंदे ) दि.16 देशाच्या 74व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विश्व जन आरोग्य सेवा समितीच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान शिबीर घेण्यात आले. सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेचे पूजन सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे,फौजदार गडवे,गटविकास अधिकारी कुसनेनिवाड, मैनाताई शिवाजी भडके सभापती पंचायत समिती,भूम यांच्या हस्ते करून शिबिरास प्रारंभ झाला.या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले, विशेष बाब म्हणजे महिलांनी देखील सहभाग नोंदवला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रक्तदान शिबिरांची आवश्यकता बोलून दाखविली होती. राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते.
त्याला प्रतिसाद देत,विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती.छायाताई भगत यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील 30 ठिकाणी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात,गर्दी टाळत रक्तदान शिबीर घेण्यात आले.
भगवंत रक्तपेढी बार्शी यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदात्यांचे अत्यंत सुरक्षितपणे आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करूनच रक्त घेतले गेले आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगबाबतही विशेष काळजी घेण्यात आली होती. दोन रक्तदात्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते.महिलांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला होता. शिवाय, स्वच्छतेची विशेष खबरदारी म्हणून वारंवार सिनेटाईझरचा वापर करण्यात येत होता.सोशल डिश्टनशिंगचे पालन व आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे सोमनाथ कोकाटे यांनी बोलताना सांगितले.
राज्यात दररोज साधारण पाच ते सात हजार रूग्णांना विविध शस्त्रक्रिया आणि आजारी रूग्णांना रक्ताची गरज असते. कोरोनामुळे नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिरांना फटका बसला आहे. शिवाय, उन्हाळी सुट्टीतील अनेक मोठे रक्तदान शिबिर कोरोनामुळे आयोजितच केले गेले नाहीत. त्यामुळे राज्यात अवघ्या काही दिवसांचाच रक्त साठा शिल्लक असल्याची माहिती स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. शिवाय, छोट्या स्तरावर रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे आवाहनही केले होते.
सर्व रक्तदाते सोशल डिश्टनसिंगचे पालन करून उपस्थितीत होते. सोशल डिस्टंसिंग सह अन्य उपाययोनांचेही समितीच्या कार्याचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
यावेळी सोमनाथ कोकाटे जिल्हा समन्वयक विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य शाखा धाराशिव तथा जिल्हाध्यक्ष विश्व जन मराठा संघ धाराशिव,मनिषा ताई चौधरी महिला जिल्हाध्यक्ष, राहुल शिंदे विश्व जन आरोग्य सेवा समिती आरोग्यदूत परंडा अजित तांबे युवक जिल्हाध्यक्ष, उमेश जाधव युवक कार्याध्यक्ष, मुकेश खैरे कार्याध्यक्ष भूम, नितीन सूर्यवंशी,रविंद्र तांबे,ताई लांडे,अमोल जाधव आदी उपस्थितीत होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा