Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

शेळगाव व परिसरासाठी धोक्याची मोठी घंटा,परिस्थितीत खूपच बिकट..!



परंडा(राहूल शिंदे) दि.8 उस्मानाबाद जिल्ह्यात आज रोजी 120 जणांचा कोरोना रिपोर्ट  पॉजिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णाची संख्या 2150वर गेली आहे,तर 64 जणांचा बळी गेला आहे. सध्यस्थितीमध्ये 1288 जण उपचार घेत आहेत.

परंडा तालुक्यातील शेळगाव येथे आज 14 व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.आजपर्यंत शेळगाव येथे कोरोनाचे 21पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत,उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण 02 तर 01 जणाचा बळी गेला आहे.सद्यःस्थितीला 18रुग्ण उपचार घेत आहेत.

शेळगाव मध्ये कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे.परिसरातील चिंचपूर(बु), पांढरेवाडी,तांदूळवडी , काळेवाडी,लोणारवाडी धोत्री, सक्करवाडी,लंगोटवाडी, जेकटेवाडी या खेडेगावाची आवक-जावक मोठ्याप्रमाणात शेळगाव येथे होत असून खूप लोकं पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात असू शकतात.

खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक गावाने स्वतः होऊन आपापल्या गावात योग्य प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे.विशेष म्हणजे नागरिकांनी खूपच अत्यावश्यक कामांसाठीच योग्य खबरदारी (मास्क,सीनेटायझरचा वापर,दोन व्यक्तीमध्ये सुरक्षित अंतरठेवणे) बाहेर पडणे आवश्यक आहे.

वारंवार येणाऱ्या प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.अपवावर विश्वास ठेऊ नका व कोणत्याही प्रकारच्या अपवा पसरवू नका, घरीच रहा-सुरक्षीत रहा!, काळजी करू नका -काळजी घ्या!  आपण सर्व मिळून कोरोनाला हरवू या ! !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध