Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

खरीप हंगाम सन 2019-20, पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर ! ! !



उस्मानाबाद(राहूल शिंदे) - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी आनंदची बातमी , खरीप हंगाम सन 2019-20 मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या बँक खात्यावर लवकरच काही अंशी रक्कम जमा होणार आहे.

खरीप हंगाम 2019-20 मध्ये या पाच जिल्ह्यातील 46 लाख 2 हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. यामध्ये लातूर जिल्ह्यातील 10लाख 82 हजार, उस्मानाबाद 11 लाख 86 हजार, नांदेड 11 लाख 92 हजार, परभणी 8 लाख 21 हजार, तर हिंगोली जिल्ह्यातील 3लाख 40 हजार शेतकऱ्यांचा समावेश होता. 23 लाख 5 हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते.

लातूर जिल्ह्यातील 6लाख 18 हजार हेक्टर, उस्मानाबाद 5 लाख 76 हजार हेक्टर, नांदेड 5 लाख 78 हजार हेक्टर, परभणी 4 लाख 30 हजार हेक्टर, तर हिंगोली जिल्ह्यातील 1लाख 50 हजार हेक्‍टर क्षेत्राचा समावेश होता. जवळपास 8 हजार 581 कोटी रुपये विमा संरक्षित रकमेसाठी 184 कोटी रुपये विमा हप्ता भरला गेला होता.

लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतील 23 लाख 6 हजार शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2019-20 मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे.

उस्मानाबाद - लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतील 23 लाख 6 हजार शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2019-20 मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. जवळपास निम्म्या शेतकऱ्यांनाच विमा परतावा मंजूर झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, पाच जिल्ह्यातील 23 लाख 6 हजार शेतकऱ्यांना 1946 कोटी रुपये विमा परतावा मंजूर आहे. विमा परताव्याची ही प्रक्रिया सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध