Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

नागझरी रेल्वे गाडीखाली प्रेमी युगुलांची आत्महत्या...!




शेगाव(प्रतिनिधी उमेश राजगुरे) शेगाव तालुक्यातील नागझरी येथील नदीच्या पुलाजवळ प्रेमीयुगुलाने धावत्या रेल्वेत खाली आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली श्रीक्षेत्र नागझरी येथील रेल्वे पुलाजवळ घडली. 

डोंगरगावच्या अल्पवयीन प्रेमीयुगुलाने धावती रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. डोंगरगाव तालुका बाळापूर जिल्‍हा अकोला येथील अल्पवयीन मुलगी गौरी गजानन सुलताने वय १६ व मुलगा भागवत मधुकर वाघमारे.अंदाजे वय 20 वर्ष यांनी धावत्या रेल्वे गाडीखाली  आत्महत्या केल्याची माहिती शेगाव रेल्वे पोलिसांनी दिली. 

माहिती मिळताच रेल्वे पोलिस स्टेशनचे ठाणेदार सागर गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली म.पो.हे. कॉन्स्टेबल बाळू खिरोळे व सहकारी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोघांचे मृतदेहाचे तुकडे झालेले होते. 

मृत्यू देह सई बाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालय शेगाव येथे आणून शेव विच्छेदना नंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले. याप्रकरणीरेल्वे पोलीस स्टेशन मध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध