Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०
गटविकास अधिकारी संदीप वायाळ...! यांनी केली दहिवद ग्रामपंचायतीची सखोल चौकशी...!
पंकज पाटील ,उपसंपादक तरुण गर्जना
गटविकास अधिकारी संदीप वायाळ हे अमळनेर तालुक्यात सहाय्यक गटविकास अधिकारी पदावर रुजू झाल्यापासूनच ते नेहमीच चर्चेत राहिले.
गटविकास अधिकारी पदाचा पदभार रिक्त असल्याने नियमाप्रमाणे रुजू झाल्यापासूनच दीर्घ काळ त्यांच्याकडे गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार राहिला.
गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी दहिवद येथील २०१९ -२० व २०२० -२१ या आर्थिक वर्षाचा आतापर्यंतचा लेखा –जोगा तपासला.
दहिवद ग्रामपंचायतीच्या संपूर्ण व्यवहाराची १ ते ४२ नमुन्यात कसून चौकशी केली.नेहमी वादाच्या भवऱ्यात असणाऱ्या दहिवद ग्रामपंचायतीचे दफ्तर तपासणी करून एक वेगळा आदर्श त्यांनी जिल्ह्यातील इतर गटविकास अधिकारी यांच्या समोर उभा केला आहे. आतापर्यंत त्यांनी चार ग्रामपंचायतीना भेट दिली असून त्यातल्या दोन ग्रामपंचायती बंद आढळून आल्यात तर दोन ग्रामपंचायतीत ग्रामसेवक जागेवर हजर नसल्याचे त्यांनी सांगितले.
गटविकास अधिकारी संदीप वायाळ यापुढे तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायती स्वतः तपासणी करणार असून ज्या ग्रामपंचायतीचे दफ्तर अपुर्ण अथवा आर्थिक व्यवहारात गैरव्यवहार आढळून येईल त्या ग्रामसेवक व सरपंचावर शासन नियमानुसार कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांच्या या कारवाईमुळे तालुक्यात ग्रामपंचायतीत गैरकारभार करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचाचे चांगलेच धाबे दणाणले असून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचे चित्र तालुक्यात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा