Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

मालपूर येथे शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेविषयी मार्गदर्शन...!



मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषि महाविद्यालय पुणे येथील कृषिदूत निखिल युवराज खैरनार यांनी कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना जैविक आणि रासायनिक पद्धतीने बीजप्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले.  

त्यांनी गाव परिसरातील शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया पद्धतीचा पेरणीसाठी कसा वापर करावा याबाबत माहिती दिली. बीजप्रक्रिया पद्धतीमुळे पेरणीसाठी एकसारखे बियाणे उपलब्ध होते व पेरणी सुलभ होते. तसेच रोग नियंत्रणाच्या खर्चात बचत होते. बियाण्यांची उगवण क्षमता वाढून उत्पन्नात वाढ होते. 

बियाणांचा दर्जा वाढवला जाऊन बाजार भाव चांगला मिळतो. हे लक्षात घेऊन निखिल खैरनार यांनी बीजप्रक्रिया पद्धत कशी करावी, त्याचे फायदे व परिणाम याबाबत माहिती दिली. तसेच आधुनिक शेतीसाठी मोबाईल अँप व त्याचा वापर कसा करावा, तण नियंत्रणाच्या पद्धती , फळ पिकांसाठी खतांचा योग्य वापर, शून्य ऊर्जा क्षमतेने भाजीपाला कश्या पद्धतीने साठवावा याची माहिती दिली. 

या वेळी श्री सखाराम लिंगायत, भटू माळी, छोटू वसईकर, हेमंत पवार, प्रशांत अडगाळे आदी शेतकरी उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. जी. जी. खोत, कार्यक्रम समन्वयक प्रा.डॉ. तरडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर. ए. कारंडे, विषय तज्ञ प्रा. डॉ. खडतरे यांचे मार्गदर्शन लाभले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध