Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

कृषीदुता तर्फे शेतकर्‍यांना शेती विषयक अॅपचे मार्गदर्शन...!




प्रतिनिधी रावेर रावेर तालुक्यातील रसलपुर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालय, शहादा येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिकाचा भाग म्हणून ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना विविध शेती अॅपच्या माध्यमातून कसे ओळखायचे व त्यावरील औषधांची फवारणी योग्य पद्धतीने कशी करावी अशा अॅप विषयी माहिती दिली. 

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ,जैविक आणि सेंद्रिय  शेतीचे व्यवस्थापन, शेतीपूरक व्यवसाय, हवामान अंदाज, याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन केले. यावेळी विश्वनाथ निळे, बाळु सोहनी,  किरण निळे,विश्वनाथ धनके,हरिश्चंद्र  निळे, दिपक निळे आदी शेतकरी उपस्थित होते . 

यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पी.एल.पटेल व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध