Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०
शिरपूर येथील प्रसिद्ध उद्योगपती तपणभाई मुकेशभाई पटेल यांचा अपघाती मृत्यू...!
शिरपूर:येथील प्रसिद्ध उद्योगपती व शिरपूर वरवाडे नगरपालिकेचे बांधकाम सभापती तसेच आ.अमरिश भाई पटेल यांचे पुतणे तपणभाई मुकेशभाई पटेल यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
हा अपघात बुधवारी ३० सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर भरधाव वेगाने दुभाजकाला धडक दिल्याने हा अपघात झाला.
सावळदे निम्स कॅम्पसमधून एम.एच.१८ एएक्स८ मर्सिडीज कारने घराकडे येत असतांना महामार्गावरील शिरपूर टोल नाक्याजवळ हॉटेल गॅलेक्झीसमोर दुभाजकाला धडक दिल्याने हा अपघात झाला. गाडीचा वेग अधिक असल्यामुळे गाडी रस्त्याच्या विरूध्द दिशेला जावून आदळली. हा अपघात एवढा भीषण आहे.
की गाडीचा पुढील भाग चक्काचूर होवून गाडीचे दोन्ही चाक निखळले गेले आहेत. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने येथील नगरपालिकेच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलला आणण्यात आले.मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.त्यांचा अंत्यविधी आज संध्याकाळी ५ वाजता आर.सी. पटेल फार्मसी कॉलेज प्रांगणात अंत्यसंस्कार होणार आहे.
शिवसेनेचे माजी खासदार स्व मुकेशभाई पटेल यांचा तो मुलगा होता. माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचा तो पुतण्या होता.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा