Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
पटेल परिवाराने करवंद धरणातील गाळ काढल्याचा शेतकऱ्यांना झाला मोठा लाभ, अनेक बोअरवेल चे पाणी होतेय ओवरफ्लो, शेतकरी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण..!
पटेल परिवाराने करवंद धरणातील गाळ काढल्याचा शेतकऱ्यांना झाला मोठा लाभ, अनेक बोअरवेल चे पाणी होतेय ओवरफ्लो, शेतकरी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण..!
शिरपूर:प्रतिनिधी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली करवंद धरणातील गाळ काढण्यात आल्याने परिसरात जमिनीत पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. असंख्य शेतकरी बांधव यांना फार मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे.
करवंद,लौकी, कन्हेरीपाडा शिवारात अनेक बोअरवेलचे पाणी ओवरफ्लो होत आहे. शेतकरी व ग्रामस्थांसाठी ही आनंदाची बाब असून पटेल परिवाराने आज प्रत्यक्ष शेत शिवारात भेट देऊन पाहणी करुन शेतकरी बांधव यांच्या आनंदात सहभागी झाले.
उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांनी मंगळवारी दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी करवंद परिसरात शेतात जाऊन ओवरफ्लो झालेल्या बोअरवेल व पाण्याची पातळीत झालेली वाढ प्रत्यक्ष पाहून आनंद व्यक्त केला. यावेळी उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल, जिल्हा परिषदेचे सदस्य देवेंद्र पाटील,आनंदसिंग राऊळ, भाईदास पाटील, पोलीस पाटील गोपाल वाणी, करवंद येथील शेतकरी लोटन पाटील, नामदेव न्हावी, सत्तार जमादार, सईद जमादार, भगवान वाणी, संजय चौधरी, भालेराव माळी, संदीप पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.
शिरपूर वरवाडे नगर परिषदे मार्फत माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या करवंद जॅकवेल येथे दुरुस्तीचे काम मे २०२० मध्ये हाती घेण्यात आले होते. याच वेळी येथील गाळ काढण्याचे देखील काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले होते. पटेल परिवाराने स्वतःची सर्व मशिनरी, यंत्रणा कामाला लावून गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी सुरु केले. त्यावेळी असंख्य शेतकरी बांधव यांना शेतीसाठी मोफत गाळ पुरविण्यात आला.
पहिल्यांदाच करवंद धरणातून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला. करवंद जॅकवेल पासून १ कि.मी. पेक्षा जास्त अंतरापर्यंत गाळ काढण्यात आला. यामुळे पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होवून हा गाळ शेतकरी बांधव यांना शेतीसाठी उपयुक्त देखील ठरला.
करवंद धरणातील हा बराचसा गाळ काढण्यात आल्याने बरेचसे बोअरवेल ओवरफ्लो झाले तर असंख्य बोअरवेलचे पाणी पातळी फक्त ३० ते ४० फूट पर्यंत आली. विहिरींचे पाणी हाताने घेऊ शकतो अशी आनंददायी परिस्थिती निर्माण झाली आहे. २०१८ मध्ये एकाही बोअरवेल ला पाणी नव्हते तर गेल्या दोन वर्षात चांगला पाऊस झाल्याने पाणी पातळी १५० ते २०० फूट पर्यंत पाणी होते.
आता तर धरणातील गाळ काढण्यात आल्याने पाणी बोअरवेल मधून ओवरफ्लो होणे व काही तीस ते चाळीस फूट वर पाणी येणे ही फारच मोठी चमत्कारिक बाब असल्याने परिसरातील सर्व शेतकरी बांधव व ग्रामस्थ हे पटेल परिवाराला मनापासून धन्यवाद देत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा