Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०
खेळाडूंचे आमदारांना साकडे अन एकाच दिवसात क्रीडा संकुल स्वच्छ...!
प्रतिनिधी अमळनेर: मारवड रस्त्यावर असलेल्या क्रीडा संकुलला झाडे झुडपांचा वेढा पडल्याने युवक, युवती आणि क्रीडा प्रेमींना तेथे प्रवेशही अवघड झाला होता, आमदार अनिल पाटील त्या ठिकाणी पाहणी करायला गेले असता खेळाडूंनी त्यांना साकडे घातले आणि समस्यांचा पाढा वाचताच आमदारांनी पाच-सहा जेसीबी मशिन मागवून काही तासात क्रीडा संकुल स्वच्छ करून त्याला उपयुक्त केले.
अमळनेर तालुक्याच्या क्रीडा संकुलला तरोठे, बाभूळ तसेच गवत वाढून वेढा पडला होता 6 ते 7 फूट उंचीचे झुडपे वाढल्याने ट्रॅक वरील माणूस सुद्धा दिसत नव्हता त्याचे दुष्परिणाम असे झाले भुरट्या चोरांनी तार कंपाऊंड आणि लोखंडी अँगल चोरून नेले तर काही गैरप्रकार देखील घडले, महिला खेळाडूंकरिता असुरक्षितता निर्माण झाली होती आमदार अनिल पाटील क्रीडा संकुलाची पाहणी करायला गेले असता त्या ठिकाणी पोलीस भरतीसाठी सराव करणारे तरुण, खेळाडू यांनी आमदारांना साकडे घातले ट्रॅक खराब झाला आहे.
मैदान व परिसरात झुडपे, काटे वाढले आहेत, पायी फिरणाऱ्यांनाही त्रास होत आहे, तसेच लांब उडी, उंच उडी मैदानावर योग्य माती नाही, संकुलाच्या मैदानात प्रवेश करायला देखील अडथळे आहेत, डबल बार, सिंगल बार तुटलेले आहेत, लाईटची व्यवस्था नाही आदी समस्या मांडल्या.
प्रत्येक्ष परिस्थिती पाहून आमदारांना देखील अडचणीची जाणीव झाली त्यांनी ताबडतोब तहसीलदार मिलिंद वाघ व क्रीडा समितीच्या शिक्षकांशी संपर्क साधून तातडीने वॉशआऊट मोहीम राबवली, स्वतःच्या जेसीबी सह इतर पाच ते सहा जेसीबी मशीनच्या साहाय्याने स्वच्छता मोहीम सुरू केली अवघ्या काही तासात झुडुपे काढून टाकण्यात आली, मुरूम मागवून क्रीडा संकुलातील प्रवेश रस्ता दुरुस्त केला, उडी मारण्याच्या मैदानावर घेसुची माती तर ट्रॅकवर लाल किंवा पिवळी माती टाकुन अजून काही पथदिवे लावून उजेडाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.
त्याच प्रमाणे मारवड रस्त्याच्या कडेला देखील झुडुपे वाढल्याने रस्ता अरुंद झाला होता, वाहनाचे अपघात होत होते कालच दोन मोटरसायकलची धडक होऊन 2 तरुण गंभीर जखमी झाले होते म्हणून मारवड रस्त्यावरील 2 किमी पर्यंत झाडे झुडुपे काढून रस्ता मोकळा करण्यात आला.
यावेळी आमदार अनिल पाटील यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, तालुका क्रीडा समन्वयक सुनील वाघ, क्रीडा संघटनेचे सचिव डी डी राजपूत, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, वरिष्ठ खेळाडू रविंद्र चावरीया, माजी नगरसेवक विनोद कदम,संदीप घोरपडे,पत्रकार किरण पाटील, गणेश भामरे, महेश माळी, निलेश विसपुते, के यु बागुल,व्ही जी बोरसे,संजय बोरसे,किशोर मोरे, रोहिदास महाजन, मंडळअधिकारी पी एस पाटील, तलाठी गणेश महाजन,धीरज देशमुख, राजेंद्र देशमुख, डी ए धनगर, सुशांत पाटील यांच्या सह क्रीडा शिक्षक हजर होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा