Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०
मराठवाडा मुक्तीसंग्रामदिन साध्या पद्धतीने साजरा होणार...!
उस्मानाबाद(राहूल शिंदे)दि.16 जिल्हयामध्ये कोविडचे रुग्ण संख्या दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात वाढत असल्याने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने, 17 सप्टेंबर रोजीचा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
ध्वजारोहण कार्यक्रमाशी निगडीत कर्मचारी अधिकारी व पोलीस अधिकारी यांना प्रवेश निश्चीत करण्यात आला आहे,
असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
या व्यतिरिक्त केंद्र शासनाच्या निर्देशनुसार कोरोनाचा संसर्ग होवू नये. त्याअुनषंगाने सोशल डिस्टींग अनुपालन करण्याच्या अनुषंगाने 50 व्यक्तींना ध्वजारोहण कार्यक्रम साठी प्रवेश निश्चीत करण्याचे ठरले आहे.
तसेच शासन निर्णय सामन्य प्रशासन 14 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार उस्मानाबाद जिल्हयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा.पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते दि.17 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 8.45 वाजता स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम. व 9.00 वाजता ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.
तसेच तालुक्याच्या ठिकाणी मुख्य शासकीय कार्यक्रमाचे ध्वजारोहण प्रातअधिकारी/तहसिलदार यांच्या हस्ते होण्याचे आदेश आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर 60 वर्षावरील ज्येष्ठ स्वातंत्रय सैनिक, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी नम्र आवाहन करण्यात येते की कोरोनाच्या पार्श्वभुमीवर घरी बसूनच मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे.
तसेच प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दार जवळ थर्मामिटर व पल्स ऑक्सीमीटरच्या सहायाने तपासणी करण्यात येणार आहे, असे ही प्रशासनाने कळविले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा