Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला शेगावात प्रारंभ...!आरोग्याची काळजी घेण्याचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांचे आवाहन...!
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला शेगावात प्रारंभ...!आरोग्याची काळजी घेण्याचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांचे आवाहन...!
शेगाव ( प्रतिनिधी उमेश राजगुरे) राज्य शासनाच्या निर्देशानुसार आज 15 सप्टेंबर पासून शेगाव नगरपालिकेतर्फे शहरात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यास प्रारंभ करण्यात आला याबाबत शेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी माहिती देताना सांगितले की शेगाव शहरात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने निघत आहेत याला आळा घालण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने आज पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरू केली आहे शेगाव शहरात नगरपालिकेच्या वतीने व कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर घरोघरी जाऊन कोरोना बाबत जनजागृती करणार आहेत.
या मोहिमेमध्ये शेगाव नगरपालिकेचे पदाधिकारी व नगरसेवक हे सुद्धा सहभाग घेणार असल्याची माहिती मुख्याधिकारी शेळके यांनी दिली शेगाव शहरातील डायबिटीज हायपर टेन्शन अस्थमा दमा या सारख्या आजाराच्या तक्रारी असतील अश्या नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी याचप्रमाणे सर्दी ताप खोकला असल्यास येथील सरकारी रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम 15 सप्टेंबर पासून प्रारंभ होऊन पुढील महिन्यात 25 ऑक्टोंबर पर्यंत चालणार असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा