Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०
इलेक्ट्रिक हीटर चे चटके देऊन चिमुकल्यास मारण्याचा प्रयत्न...!
शेगाव(प्रतिनिधी उमेश राजगुरे)एका चार वर्षीय चिमुकल्याचा इलेक्ट्रिक हीटर चे चटके देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशनला देण्यात आली असून पोलिसांनी आरोपीस अटक करून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली.
शहर पोलीस स्टेशनला दाखल तक्रारीनुसार फिर्यादी सुरेश चिंचोलकार वय 31 राहणार भोईपुरा यांनी आरोपी महादेव सीताराम लांबे यांची जागा त्यांच्याकडून कायदेशीर खरेदी करून घेतली.मात्र त्यानंतर आरोपी ताने फिर्यादी ला पैसे कमी दिले असा राग मनात धरून 1 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता सुमारास फिर्याधीचा ४ वर्षे वयाचा दर्शन हा आरोपी च्या घरासमोर खेळत असताना आरोपीने त्याला आपल्या घरी बोलावले व त्यांच्या छातीवर मांडी व मान्यवर इलेक्ट्रिक हीटर चटके देऊन गंभीर रित्या जखमी करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला.दरम्यान चिमुकल्याची आई घटनास्थळी आपल्या मुलास सोडवण्यास गेलेली असतात आरोपीने तिला ही इलेक्ट्रिक हीटर चे चटके दिले अशा रिपोर्टवर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम307 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक ताले यांच्या मार्गदर्शनात सह पोलिस निरीक्षक कमलेश खंडारे हे करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा