Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
लुटमारी करणाऱ्या सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्यात यावी-महाराष्ट्र नवनिर्माण सेना...!
लुटमारी करणाऱ्या सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्यात यावी-महाराष्ट्र नवनिर्माण सेना...!
उस्मानाबाद (राहूल शिंदे)दि.14 शहरातील सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल covid-19 रुग्णांकडून टेस्ट साठी जास्तीची रक्कम आकारून मोठ्या प्रमाणात लूट करीत आहेत अँटीजन टेस्टसाठी जास्तीची रक्कम आकारून मोठ्या प्रमाणात लूट करीत आहेत अँटीजन टेस्ट साठी शासनाचे दर 600 रुपये असताना रुग्णांच्या नातेवाइकांकडून रुपये 2000 इतके आकारले जातात अशी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयास केली असून त्यात 72 रुग्णांची लेटेस्ट केल्याची माहिती दिली आहे.
तरी त्या सर्व रुग्णांचे जास्तीची घेण्यात आलेली रक्कम परत करण्यात यावी तसेच सह्याद्री हॉस्पिटल मे महात्मा फुले जन आरोग्य योजना पूर्णपणे मोफत असताना दि. 6 नोव्हेंबर 2015 ते दि.23 जानेवारी 2019 पर्यंत या योजनेत अंतर्गत 8205 रुग्णांनी उपचार घेतले त्यापैकी 7599 रुग्णांचे उपचारासाठी शासनाकडून 7कोटी 66 लाख 72 हजार 125 रुपये केल्म स्वरूपात देण्यात आले अशा तक्रारी मा.जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या आहेत.
तरीदेखील आत्तापर्यंत हॉस्पिटल वर काहीही कार्यवाही झालेली इतरही शहरातील कोव्हिड हॉस्पिटलमध्ये टेस्ट साठी रुग्णांकडून बेकायदेशीररित्या जास्त पैसे घेऊन लुबाडणूक फसवणूक करीत आहेत,त्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी,अशी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे,
तरी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी लवकरात लवकर करण्यात यावी सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटल ची मान्यता रद्द करून कार्यवाही करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे..
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा