Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

शेगाव शहरातील टेलरने पाठविलेला मास्क पंतप्रधानांनी स्वीकारला...!



शेगांव (प्रतिनिधी) उमेश राजगुरे- शेगाव शहरातील बालाजी टॉवर येथील स्वामी टेलर्स या दुकानाचे मालक कृष्णा पाटील यांनी स्वत शिवलेला मास्क नरेंद्र मोदी यांना नवी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयाच्या पत्यावर पाठविला असता पंतप्रधान मोदी यांनी मास्कचा स्विकार केल्याबाबतचे पंतप्रधान कार्यालयाचे पत्र कृष्णा पाटील यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.

जेन्टस स्पेशालिस्ट टेलर कृष्णा पाटील हे नरेंद्र मोदी यांचे अनुयायी असल्याने त्यांनी मोदी यांच्याकरीता त्यांच्या पध्दतीने एक खास मास्क शिवला व नरेंद्र मोदी यांना त्यांच्या नवी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयाच्या पत्त्यावर पोस्टाने पाठविला त्यानंतर १५‌ दिवसांनी पंतप्रधान कार्यालयातून पाठविण्यात आलेले पत्र त्यांना प्राप्त झाले असून त्यामध्ये मोदी यांनी मास्क स्विकारल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

तसेच मास्क सोबत पाठविलेल्या पत्रातील मजकूर सुध्दा मोदींनी वाचल्याचे पत्रात नमूद आहे. तर पंतप्रधान मोदींनी आपण दिलेला मास्क स्विकारल्या चे पत्र वाचून कृष्णा पाटील यांना अत्यंत आनंद झाला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध