Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
कोपरगांव शहरात शिव सेना भोईबांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करेल...!कलविंदर डडीयाल...!
कोपरगांव शहरात शिव सेना भोईबांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करेल...!कलविंदर डडीयाल...!
कोपरगांव प्रतिनिधी: कोपरगांव शहरात भोई समाज आपल्या पारंपरिक व्यवसायाबरोबरच भाजीपाला विकणे, चणेफुटाणे विकणे,मासे विक्री करणे, वडापावचे दुकान लावणे,फळफळावळ विक्री करणे असे विविध व्यवसाय करत असुन काही वेळा व्यवसाय करतांना समाजघटकांना अनेक बाबींचा सामना करावा लागतो अशा वेळी त्यांना मदतीचा हातभार शासकीय, सामाजिक व राजकीयपटलावरुन होणे व समस्याचे निराकरण होण्यासाठी मदत होणे अतिमहत्त्वाचे असते.
कोपरगांव शहरात शिवसेना पक्षातर्फे श्री कलविदंर डडीयाल याची कोपरगांव शिवसेना शहर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार कोपरगांव शहर भोई समाजातर्फे करण्यात आला.
यावेळी कोपरगांव शहरात शिवसेना ही भोई समाज बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करेल असे सामाजिक सत्काराच्या वेळी नवनियुक्त शिवसेना शहर प्रमुख श्री कलविंदर डडीयाल यांनी माजी शहरप्रमुख भरतभाऊ मोरे,उपशहरप्रमुख गगन हाडा, विक्रम झावरे,भुषण पाटणकर,मयुर खैरनार योगेश बन्सीलाल मोरे,शिव व्यापारी सेना शहरअध्यक्ष अर्जुन रघुनाथ मोरे,महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख विजयभाऊ मोरे,नगर जिल्हा अध्यक्ष समाजसेवक जिवन मोरे, समाजसेवक मच्छिंद्र भोई, समाजसेवक मनोज मोरे, समाजसेवक अनिल हारणे, समाजसेवक सतिष शिंगाणे व इतर अनेक समाजबांधवांच्या उपस्थित सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा