Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०
विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या महाआघाडी सरकारचा निषेध...!
शेगांव( प्रतिनिधी उमेश राजगुरे) विद्यार्थ्याच्या अनेक समस्या सोडविण्या संबंधीचे एक निवेदन धुळे येथील अभाविपच्या कार्यकर्त्यानी राज्याचे मंत्री ना. अब्दुल सत्तार यांना देण्यासाठी वेळ मागितला पण महाआघाडी सरकारातील या मंत्र्याना विद्यार्थ्यांचे प्रश्न महत्वपूर्ण वाटले नाही म्हणून त्यांनी अभाविपच्या कार्यकर्ताना वेळ तर दिलीच नाही उलट पोलिसानं कडून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली .
या घटनेचा निषेध करत तसे निवेदन येथील अभाविपच्या कार्यकर्त्यांना तहसीलदार यांना दिले .
महाराष्ट्रातील विद्ार्थ्यांच्या विविध प्रश्नाबाबत तसेच धुळे येथील अब्दुल सत्तार यांच्या गाडी चा ताफा अडविल्या प्रकरणी तेथील विद्ार्थ्यांना गुन्हेगारा सारखी अमानुष मारहाण करण्यात आली . त्याबद्दल महाआघाडी शासनाचा अभाविप ने निषेध केला आहे असे निवेदनात म्हटले आहे .
कोरोना महामारीमुळे अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहे . परंतू विद्यार्थ्याकडून त्या परीक्षांचे शुल्क घेण्यात आले आहे . तरी ही विद्ार्थ्यां चे हे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे , शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ या वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात ३० % कपात करण्यात यावी . सरसरीच्या सुत्रामुळे चुकीच्या पध्दतीने लावण्यात आलेल्या निकालाचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे , नवीन शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी विद्ार्थ्यांकडून एकूण शैक्षनिक शुल्काच्या जास्तीत जास्त १५% शुल्क घेऊन प्रवेश देण्यात यावा व उर्वरित शैक्षणिक शुल्क चार टप्यात घेण्यात यावे , अश्या मागण्या निवेदनात नमूद आहे . निवेदन देताना अभाविपचे कार्यकर्ते
यश संघांनी ,अभिषेक घोराडे ,योगेश कडू , भरत चोपडे ,ज्ञानेश्वर गणेश,राम पाटणे आदी अनेक विद्यार्थी उपस्थित होते .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा