Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

सरपंच भवन सभागृहाला स्व :अजय सुरेश गवई यांचे नाव देण्याबाबत पंचायत समिती शेगांव ला सरपंच संगटनेने दिले पत्र...!



शेगांव (प्रतिनिधी उमेश राजगुरे) शेगांव तालुक्यातील ग्रामपंचायत तिव्हाण खुर्द बुद्रुक येथील लोकनियुक्त तरुण सरपंच स्व. अजय सुरेश गवई यांच्या आकस्मिक निधनाने सदरील ग्राम सामाजिक सरपंच उपसरपंच संघटना शेगांव यांच्या वतीने शेगांव सभापती व गटविकास अधिकारी शेगांव यांना पंचायत समिती अंतर्गत असलेले सरपंच भवन ला स्व अजय सुरेश गवई भवन नाव देणे संदर्भात विनंती अर्ज देण्यात आला.

दरम्यान सरपंच उपसरपंच संघटनेचे  अध्यक्ष तथा तालुका उपप्रमुख शिवसेना "तथा सरपंच ग्रामपंचायत खातखेड  श्री. रामेश्वर गजानन थारकर  सोबत सचिव श्री दिनेशभाऊ शिंगाडे सरपंच कुरखेड, सरपंच श्री सिद्धार्थ गवई टाकली धारव, भास्कर बाठे सगोडा, विलास ससाणे मछिंद्रखेड, कैलास दाभाडे अडसूड, अनंता शेळके भोंनगाव  मोतीराम खवले इतर सर्व संघटनेचे सदस्य पदाधिकारी व शेगांव पंचायत समिती अधिकारी उपस्तित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध