Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०
शिरूड येथील बससेवा पुन्हा सुरू करण्याबाबत
मा.विभागप्रमुख सो. रा.प.महामंडळ धुळे
विषय : शिरूड येथील बससेवा पुन्हा सुरू करण्याबाबत
महोदय कोरोना लॉकडाऊन काळात अनेक व्यवसाय बंद झाले आता सरकार ने मिशन बिगीन अंतर्गत अनेक आस्थापना सुरू करण्याचा निर्णय घेतला तसेच वाहतूक पूर्ववत व्हावी म्हणून ग्रामीण भागाचा फक्त आवश्यक घटक असणारी एसटी बसेस देखील सुरू करण्याचा निर्णय घेतला मात्र धुळे तालुक्यातील महत्वाचे गाव असणारे व अनेक महत्त्वाच्या गावांना जोडणारे शिरुड व आजूबाजूच्या गावांना धुळ्यासोबत जोडणारी बस ची सोय अजूनही बंद आहे.
महोदय आमचे शिरूड खोरदड मोरदड बोरविहीर वेलाने कुंडाणे या भागात अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच युवक हे शिक्षणासाठी रोजगारासाठी धुळ्यात येत असतात व वाहतुकीची सध्या साधन उपलब्ध नसल्याने लहान विद्यार्थ्यांचे विशेषता महिलांचे युवतींना प्रचंड त्रास होत आहे तसेच भविष्यात यामुळे एखादी अघटित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी आपणास विनंती की या भागातील बस सेवा पूर्ववत सुरू करावी यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनी व महिला यांचा त्रास कमी होईल भविष्य अघटित घटना घडणा टाळता येईल व विद्यार्थ्यांना युवकांना वाहतुकीची सोय होईल म्हणून हि नम्र विनंती यावेळी मनविसे जिल्हाउपाध्यक्ष यश शर्मा, मनोज कोळी,योगेश कोळी,आदेश सावंत, दिनेश कोळी, दिपक बोरसे, कार्तीक जयस्वाल, पंकज मराठे, रावसाहेब माळी, किरण माळी, सचिन बोरसे, पवन मराठे रवी मराठे आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा