Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०
उस्मानाबाद-कळंबचे आमदार कैलास पाटील कोरोना पॉझिटिव्ह....!
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.11 उस्मानाबाद - कळंब विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार कैलास घाडगे- पाटील यांना शुक्रवारी कोरोनाची बाधा झाली आहे.ते सध्या पुण्यात असून,होम क्वारंटाइन झाले आहेत.
मुंबईत दोन दिवस झालेल्या अधिवेशनात सहभागी झाले होते, त्यावेळी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता,परंतु आज पुन्हा तपासणी केली असता,अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अशी माहिती त्यांनी स्वतः आपल्या फेसबुक अकाऊंटद्वारे दिली आहे.
नमस्कार, आजच काही वेळापुर्वी माझा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अधिवेशनाच्या अगोदरही मी टेस्ट केली होती, त्यावेळी अहवाल निगेटिव्ह आला असल्याने मी अधिवेशनात सहभागी झालो होतो.पण काल पुन्हा टेस्ट केली होती, अहवाल आताच प्राप्त झाला असुन त्यामध्ये मी पॉझिटिव्ह आलो आहे. त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसापुर्वी माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकांनी काळजी घ्यावी व लक्षणे आढळुन येत असल्यास तातडीने टेस्ट करुन घ्यावी असे मी आवाहन करतो. माझी प्रकृती ठिक असुन काळजीचे कोणतेही कारण नाही. लवकरच उपचार घेऊन मी पुन्हा तुमच्या सेवेसाठी तयार असेन असा विश्वास व्यक्त करतो.
धन्यवाद.आपलाच कैलास पाटील.
जिल्ह्याचे खासदार काय म्हणाले?
माझे सहकारी व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत या कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य जनतेत सामावून जनतेची सेवा करत आहात. सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद आणि सदिच्छा आपल्या पाठीशी असुन आपण कोरोनारूपी संकटावर मात करून आपण पुन्हा सर्वसामान्य जनतेच्या सेवेत पुन्हा सक्रिय व्हाल. हि आई तुळजाभवानी माते चरणी प्रार्थना.. या अगोदर जिल्ह्यातील
उमरगा तालुका शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले व विधानपरिषदेचे आ.सुजितसिंह ठाकूर कोरोना पॉझिटिव्ह आले होते ते सध्या बरे झाले आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा