Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १३ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्र सरकारच्या ओदशाचा आयएमएतर्फे निषेध । माजी मंत्री आ. गिरीश महाजनांकडे संघटनेने मांडली आपली व्यथा...!
महाराष्ट्र सरकारच्या ओदशाचा आयएमएतर्फे निषेध । माजी मंत्री आ. गिरीश महाजनांकडे संघटनेने मांडली आपली व्यथा...!
जामनेर(प्रतिनिधी) संजय सूर्यवंशी:खाजगी कोवीड हॉस्पिटलचे दर राज्यशासनाने डॉक्टरांना विश्वासात न घेता एकतर्फी ठरवुन हा अन्यायकारक निर्णय आमच्यावर लादण्यात आला,याचा ईंडीयन मेडीकल असोशिएशन तर्फे तीव्र निषेध नोंदवुन,राज्यसरकारने काढलेल्या ३१ ऑगस्टचे परीपत्रक त्वरीत मागे घ्यावे अन्यथा आमच्या संघटनेला संघर्षाचा पवीत्रा घ्यावा लागेल असा ईशारा लेखी स्वरूपात संघटनेकडुन देण्यात आला आहे.
आज (१२) सकाळी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांची शिष्ठमंडळाने भेट घेऊन आपली कैफीयत मांडली.दवाखान्याच्या आयसीयुसाठी ठरविलेल्या सध्याच्या दरा मधे पिपीई कीट्स,ऑक्सीजन,बायोमेडीकल वेस्ट चार्जेस, कर्मचाऱ्यांचे पगार,निर्जंतुकीकरण आदींचा खर्च भागविणे हॉस्पिटलला अवघड होत आहे.
त्यामुळे राज्यातील सुमारे २५००० (पंचवी सहजार) खाजगी हॉस्पिटलपैकी बहुसंख्य बंद पडण्याच्या मार्गावर आहे,या समस्येवर आयएमए सोबत चर्चा करून दर वाढविण्यासाठी बैठक ३१ ऑगस्टपुर्वी निच्छीत करण्याचे ठरले.मात्र तशी कोणतीही बैठक न घेता राज्याच्या आरोग्यसचिवांनी परीपत्रक काढुन तेच दर कायम ठेवले आणी त्यात ईतर गोष्टींची भर घालुन ते दवाखान्यांना परवडण्याच्या दृष्ठीने आणखीन अवघड करून ठेवले आदी मुद्दे मांडण्यात आले आहे.
आमच्या मागण्यांचा सहानुभुतीपुर्वक विचार न केल्यास सध्या राज्यातील नेत्यांनी,शासकीय अधिकाऱ्यांनी जसे स्वतःला होम-कॉरंटाईन (सेल्फ) करून ठेवले आहे,त्याचप्रमाणे आम्हीही स्वतःची,कुटुंबाची पर्वा न करता रूग्ण सेवा देत आहोत,त्यामुळे आम्हालाही आता सामुहीक सेल्फ-कॉरंटाईन करून घेण्याची वेळ आली आहे असा ईशारा वजा सुचना मागणी पत्रात नमुद करण्यात आली आहे.यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ आर के पाटील,सचिव डॉ स्वप्नील सैतवाल,डॉ विनय सोनवणे,डॉ सुदर्शना सोनवणे,डॉ संदिप पाटील,डॉ राजेश नाईक,डॉ जयंत महाजन,डॉ प्रशांत महाजन,डॉ अमोल सेठ,डॉ सुरेश नाईक,डॉ नेहा नाईक,डॉ अमृता सैतवाल,डॉ वैशाली महाजन,डॉ आशिष वाघ आदी यावेळी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा