Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०
मराठा आरक्षण राज्याची पहिली सिंहावलोकन बैठक , उस्मानाबाद येथे संपन्न....
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.8 राज्याची पहिली सिंहावलोकन बैठक उस्मानाबाद येथे पार पडली एक दिशा' 'एक भाषा - एक धोरण' तेच 'तोरण" मराठ्यांचा "एकसूत्री" कार्यक्रम, राज्याची "सिंहावलोकन" बैठक ही दिनांक 07ऑक्टो, 2020 रोजी दुपारी 02:00 ते - सायंकाळी 06:00 दरम्यान समर्थ मंगल कार्यालय, उस्मानाबाद येथे पार पडली.
या बैठकीला अखिल भारतीय छावा चे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, मराठा महासंग्राम संस्थापक राजकुमार सूर्यवंशी, स्वाभिमानी मराठा महासंघ संस्थापक डॉ कृषीराज टकले, मराठा आरक्षण विषयाचे अभ्यासक कायदेतज्ञ अॅड. राजेश टेकाळे, अॅड. आशिष गायकवाड, अॅड. रमेश दुबे तसेच या बैठकीला मुख्य मार्गदर्शक म्हणून माजी न्यायमुर्ती बी जी कोळसे पाटील काही कारणास्तव येऊ शकले नाहीत परंतु त्यांनि फोन कॉल वरून माईक स्पीकर वरून फोनवर बैठकीला संभोधित केले, मराठा सेवा संघाचे माजी प्रदेश अध्यक्ष नेताजी गोरे, शिवधर्म फौंडेशन संस्थापक दीपक काटे, स्वराज्य सेनेचे संस्थापक संजय वाडकर, अॅड. विशाल कदम, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील, मराठा उद्योजक परिषदेचे भागचंद झंlजे, मराठा शेतकरी संघटनेचे संस्थापक सुभाष गागरे, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष तानाजी चौधरी, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गरड, मनीषा ताई राखुंडे तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी हजर होते.
या बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रासाठी आंदोलनाची एकच दिशा असावी आणि आत्तापर्यंत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी,जातीय सलोखा राखून आणि राजकीय हस्तक्षेप टाळून केंद्र आणि राज्य सरकार दोघांवर सोबतच दबाव आणण्यासाठी आंदोलनावर चर्चा करण्यात आली आणि या बैठकीला काही प्रतिनिधी येऊ शकले नाहीत म्हणून एकसूत्री भूमिका घेण्यासाठी ही एकच बैठक पुरेशी नसून परत या सिंहावलोकन बैठकीला व्यापक आणि सर्वसमावेशक स्वरूप देऊन सर्वांना सहभागी करून घेऊन संबंध महाराष्ट्रासाठी एकच दिशा एकच भाषा एकच धोरण आणि तेच तोरण आणि मराठ्यांचा असा हा एकसूत्री कार्यक्रम ठरवण्यासाठी सर्व समन्वयक सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना मराठा आरक्षण आंदोलनाची राज्याची एकसूत्री भूमिका ही 17 ऑक्टोबर ला पुण्यातून ठरवली जाईल असे आवाहन सर्वांच्या वतीने, एकमताने करण्यात आले.
या सिंहावलोकन बैठकीचे निमंत्रक हे मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती आणि आयोजक सकल मराठा समाज उस्मानाबाद चे संकेत सूर्यवंशी, विशाल लोमटे, वैभव मोरे, प्रीतम मुंडे, आकाश मुंडे, अक्षय नाईकवाडे, अमोल सिरसट, संकेत हरवले यांनी केले होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा