Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
केंद्र सरकारचा कृषी कायदा लागू नकेल्याबद्दल निषेध, राज्य सरकारच्या अध्यादेशाच्या होळी !!!
केंद्र सरकारचा कृषी कायदा लागू नकेल्याबद्दल निषेध, राज्य सरकारच्या अध्यादेशाच्या होळी !!!
शेगाव शहरं (उमेश राजगुरे)दि.8 कृषी विधेयक 2020 ला राज्य सरकारने दिलेल्या स्थगनादेश तात्काळ उठवावा अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल,असा इशारा देत त्या स्थगनादेश परिपत्रकाची शेगाव शहर व तालुका भाजपाचे वतीने येथील तहसिल कार्यालयासमोर होळी करण्यात आली आहे.
यासंदर्भात तहसीलदार शिल्पा बोबडे यांचेकडे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देणारे व त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणारे कृषी विधेयक 2020दोन्ही सभागृहात मंजूर करून घेतले मात्र महाराष्ट्रातील आघाडी सरकार शेतकऱ्यांचा विचार न करता केवळ व्यापारी व दलाल यांच्या सोयी करता तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांची लूट सुरूच राहावी म्हणून या विधेयकाला महाराष्ट्रात लागू न होण्यासाठी शासनाने स्थगन आदेश दिला आहे तरी हा स्थगन आदेश त्वरित उठून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही विनंती अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून त्रि व आंदोलन करण्यास काही पर्याय उरणार नाही याची सर्व जबाबदारी शासनाची राहील.
या निवेदनावर शेगाव तालुका व शहर भाजपा पदाधिकाऱ्यांची सह्या आहेत यामध्ये नगराध्यक्षा सौ शकुंतलाबाई बुच, गटनेते शरद अग्रवाल ,संतोषबापू देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, तालुकाध्यक्ष विजय भालतडक, यांचे नेतृत्वाखालीराज्य सरकारच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.या आंदोलनात गोविंदराव मिरगे, गजानन जवंजाळ, प्रदिप सांगळे, राजेंद्र शेगोकार, राजु अग्रवाल, डाॅ मोहन बानोले,संजय कलोरे,कमलाकर चव्हाण,पवन महाराज शर्मा,प्रमोद काठोळे, सचिन ढमाळ, अमित जाधव ,विजय यादव,निवृत्ती नांदोकार,अरूण कंकाळे, मुकिंदा खेळकर,डाॅ राजेश सराफ,शशिकांत पुंडकर, प्रकाश भारसाकळे, भागवत रोठे,शंकर निळे,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
उपसंपादक :- माधव खाबिया सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत सायंकाळच्या सुमारास पायी चालणारे महीलांचे गळयातील सोनसाखळ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा