Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

अमळनेरात गृहमंत्रीचे आगमन आणि रस्त्यातले खड्डे गायब



पंकज पाटील (उपसंपादक,तरुण गर्जना)

शासकीय यंत्रणा व लोकनेते हे जनतेच्या सेवेसाठीच कार्य करतात असे संविधानात जरी नमूद असले तरी सध्या जनता ही अधिकारी व नेत्यांची सेवा करत असल्याचे चित्र संपुर्ण भारतात आहे .

अमळनेर तालुक्यातील पुरातन वास्तू असलेल्या दगडी दरवाज्याची पाऊसामुळे क्षती झाल्याने अमळनेर तालुक्यात प्रवेश करण्यासाठी  हुतात्मा सुभाष चौक मार्गानेच वाहतूक सुरू आहे .

त्यामुळे कितेक दिवसापासून खराब असलेले अमळनेर शहरातील रस्ते नागरिकांच्या तक्रारीने देखील दुरुस्त होत नव्हते .पण अचानक गृहमंत्री महोदयांच्या दोऱ्यामुळे एका रात्रीत दुरुस्त करण्याचे महान कार्य अमळनेरच्या प्रशासनामार्फत करण्यात आले .यासाठी त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.

जनतेच्या सेवेसाठी प्रशासकीय अधिकारी व लोकनेते काम करतात असा गोड गैरसमज असताना त्याठिकाणी नेत्यांसाठी प्रशासकीय यंत्रणा कशी कंबर कसून कामाला लागते याचे उदाहरण अमळनेर मध्ये आपल्याला पाहायला मिळाले .हा भाग वेगळा की, जनतेच्या कररूपी पैश्यांनी प्रशासनातील लोकांचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटत असतो. पण जनतेचे प्रश्न तसेच राहतात .

जनतेच्या प्रश्नांचे गांभीर्य त्या तत्परतेने घेतले जात नाही. पण मंत्री आल्यानंतर सर्वच अधिकारी कामाला लागतात व बघता -बघता न सुटणारे प्रश्न देखील सुटतात .मग पुन्हा एक प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो लोकशाहीत प्रजा राजा की लोकनेते ? इतक्या दिवस सार्वजनिक बांधकाम विभाग  सोयीस्कर याकडे दुर्लक्ष करत असताना अचानक कामाला लागतो कसा ? एरवी निधी उपलब्ध नाही असं सांगून टाळाटाळ करणारे अधिकारी मंत्री आल्यावर निधी आणतात कोठून ? हे सर्वच प्रश्न जनतेच्या मनात असतात मात्र लोकशाहीत प्रजा हीच राजा असताना ती नेते व अधिकारी यांची गुलाम झालेली असल्याने त्यांच्या कर्तव्याची व हक्काची जाणीव जनतेला राहिलेली नाही .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध