Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०
अक्षरभारती पोहोचली, थेट वाचकांच्या दारी.
परंडा (राहूल शिंदे) दि.31 अक्षरभारतीचे प्रमुख अनुरागजी अग्रवाल,भानुदासजी आभाळे,राज्य समन्वयक संतोषजी शेळके,जिल्हा समन्वयक विनोद सुरवसे यांचे माध्यमातून "ज्यूनिअर कलाम उस्मानाबाद" या वाचन चळवळीच्या गृप द्वारे अक्षरभारती वाचनालयाची पुस्तके स्पीड पोस्टाने थेट वाचकां पर्यंत जाऊन वाचन चळवळीला गती यावी म्हणून सहयोगी ग्रूप सदस्य वैजिनाथ सावंत यांनी ही पुस्तके पोस्टातून घेतली व वाचकांच्या दारी जाऊन वाचनासाठी प्रेरणा देऊन प्रत्येकी पाच पुस्तके वाटप केली.
महिनाभरात ही पुस्तके वाचन करून दर शनिवारी झूम मिटिंग मध्ये वाचलेल्या पुस्तकाचे एका सदस्याने विवेचन करायचे यामुळे वाचनाला गती मिळून पुस्तकांचे नाव त्यातील मतितार्थ सर्वांना कळेल नि ज्ञानात भर पडून आनंद मिळेल.
डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी वाचनाला खुपच महत्व दिले आणि सर्वसामान्य कुटूंबातील व्यक्ती वाचनामुळे राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकतो हे जगाला दाखवून दिले.वाचनाने माणूस वैचारिक होतो,वाचन केल्याने माणसाला वैचारीक अधिष्ठान प्राप्त होते,समाजाला घडविण्याची व योग्य दिशा देण्याची पात्रता येते म्हणूनच महाराष्ट्र शासनाने डाॅ.अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर जन्मदिन हा "वाचन प्रेरणा दिन" म्हणून जाहीर केला आहे.
याच धर्तीवर अक्षरभारती पुणे ही संस्था समाजामध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन प्रेरणा मिळावी म्हणून कित्येक वर्ष झाले स्वयंम प्रेरणेने काम करत आहे,समाजाला जागं व सुसंस्कृत करण्याचं काम अविरत पणे करत आहे, कोविड-19 चे सावट असतानाही वाचन चळवळ न थांबवता ज्यूनि.कलाम या गृपच्या माध्यमातून सामाजिक कार्यात व वाचनाचा रस असलेल्या गृप सदस्यां द्वारे गावोगावी पोस्टाने पुस्तके पाठवून वाचन चळवळीला गती देत आहे व सामाजिक भान जपत आहे.
याचाच भाग म्हणून आज परंडा तालुक्यातील शेळगाव यागावी अक्षरभारतीने पाठवलेल्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.यावेळी
अक्षरभारतीच्या वतीने वैजिनाथ सावंत यांनी शांतीनाथ वाघमारे,लक्ष्मण औताडे,शहाजी झगडे,रघुनाथ दैन यांना पुस्तके देऊन वाचन चळवळीला उभारी दिली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा