Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १ नोव्हेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
कपाशीच्या व्यापारा साठी वापरल्या बनावट ५०० च्या नोटा, शहापुर जवळ एकास २६,५०० च्या डुप्लीकेट नोटांसह अटक..!
कपाशीच्या व्यापारा साठी वापरल्या बनावट ५०० च्या नोटा, शहापुर जवळ एकास २६,५०० च्या डुप्लीकेट नोटांसह अटक..!
जामनेर(प्रतिनिधी)संजय सूर्यवंशी
तालुक्यात बनावट (नकली) चलनी नोटांद्वारा चक्क कपाशीचा व्यापार करणाऱ्या एकास खबऱ्याच्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन २६,५०० च्या बनावट नोटांसह ताब्यात घेऊन अटक केली.
शेख फारूक शेख नवाब वय ४५ रा शहापुर ता जामनेर असे संशयीत आरोपीचे नांव आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की वरील आरोपी फारूक शेख हा लहान-मोठ्या मालवाहतुक वाहनांमधुन कपाशी खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो, ईतरांपेक्षा शेतकऱ्यांना क्विटलमागे शंभर-पन्नास रुपये जादा भाव सांगतो,त्यामुळेही अनेकांचा ओढा त्याकडे जास्त असतो,मात्र या कपाशीच्या खरेदी करतांना कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती मात्र बऱ्याचशा बनावट नोटांचा भरणा ईतर अस्सल करंसित मोजल्या जातात,याकडे शेतकऱ्यांसह कोणाचेच लक्ष नसल्याने आरोपीने बाजारात कोठुन आणल्या किती व कोठे-कोठे बनावट नोटा वापरल्या याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडेच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
गुजरात सह राज्यातील नंदुरबार,बोदवड,
जामनेर मधे या नकली नोटांच्या वापराची शक्यता असल्याने त्या दिशेनेही तपासाची चक्रे फिरविण्यात आल्याचे समजते,त्यामुळे या बनावट नोटा बाळगुन त्यांना व्यापारीकरणाच्या नावाखाली खपविण्याच्या या गोरख धंद्यामागे परीसरातील एक मोठे रॅकेटच (साखळी) असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
फक्त एक लाखात पाच लाखांच्या बनावट नोटा वरील आरोपीच्या सांगण्या नुसार फक्त एका लाखात पाच लाखांची बनावट (नकली नोटा) आणल्या होत्या,आणी या सर्व नोटा ५०० च्या किंमतीच्या आहेत, त्यातील बहुतांश नोटा कपाशी खरेदीत खपवीण्यात आल्या,तर पोलीसांनी अटक केली त्यावेळी आरोपीताजवळ २६,५०० च्या बनावट चलनी नोटा आढळुन आल्या,या घटनेमुळे विवीध व्यापारी वर्गासह ग्राहकांमधे घबराटीचे वातावरण आहे.
स्थानीक गुन्हे शाखेचे विजय पाटील व सचिन महाजन यांना त्यांच्या पंटरने (खबरी) दिलेल्या गुप्त माहिती वरून पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाळे,पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे,पोकॉ सुनील दामोदर, विजय पाटील,नंदु पाटील,भगवान पाटील,सचिन महाजन आदींच्या पथकाने सापळा रचुन आरोपीला बनावट नोटांसह ताब्यात घेऊन अटक केली.
दरम्यान सुगाव्यानुसार आधी एका व्यक्तीला बनावट ग्राहक म्हणुन पाठविले होते.याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असुन आणखी किती जणांचा बनावट नोटा बाळगणे-खपविण्यात समावेश असेल यावीषयी जनतेला उत्सुकता आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा