Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
हाथरस प्रकरणी लवकर न्याय मिळण्यासाठी, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने उमरगा पोलीस स्टेशन येथे निवेदन.....
हाथरस प्रकरणी लवकर न्याय मिळण्यासाठी, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने उमरगा पोलीस स्टेशन येथे निवेदन.....
उमरगा (राहूल शिंदे) दि.6 उमरगा पोलीस स्टेशन येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले. सविस्तर वृत्त असे की,उत्तरप्रदेशातील हाथरस येथील एका निष्पाप मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिच्यासोबत काही नराधमांनी अतिशय अमानवीय कृत्य केले आहे.दिल्ली येथे उपचारादरम्यान त्या मुलीचा मृत्यू झाला असून तिच्या आईवडिलांच्या गैरहजेरीतच पोलिसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले.ही अतिशय घृणास्पद व मानवजातीला काळिमा फासणारी घटना असून दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे व सरकार नावाच्या यंत्रनेचा गुंडांना कोणताही धाक राहिलेला नाही हे दिसून येते.त्यामुळे खुलेआम असे प्रकार दिवसाढवळ्या घडत असून महिलांचे जीवन असुरक्षित झाले आहे.
जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने या अमानवी घटनेचा जाहीर निषेध केला असून या प्रकरणातील आरोपींना एक महिन्याच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. महिला ही कोणत्याही जातीधर्मातील असो तिचा सन्मान आणि सुरक्षा झालीच पाहिजे.तिथे जातधर्म अजिबात आडवा येता कामा नये.त्यामुळे उत्तरप्रदेश सरकारने या घटनेकडे अजिबात दुर्लक्ष न करता हे प्रकरण गांभीर्याने घेवून दोषींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी व पिडीत मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी,
जिजाऊ ब्रिगेड उमरगाच्या वतीने निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक घाडगे यांना करण्यात आली.
या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश महासचिव सारिका आंबूरे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा सुनंदा माने,जिल्हा प्रवक्त्या रेखा सूर्यवंशी, तालुका अध्यक्षा रेखा पवार, तालुका सचिव मंजुषा चव्हाण,तालुका कार्याध्यक्षा लता भोसले, तालुका संघटक वैशाली जाधव, मीनाक्षी जाधव, कल्पना कांबळे व उमरगा येथील सर्व महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा