Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०

होळनांथे येथील भोई समाजाचा 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न सुटला



शिरपूर प्रतिनिधी: होळनांथे गावात भोई समाजाचे कुल दैवत चौधारा आई माता मंदिर व सभा गृहचा भुमिपुजना सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटक चिंतनभाई पटेल, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार काशीराम दादा पावरा


आ.अमरिषभाई पटेल - ५ लक्ष व खासदार हिनाताई गावित यांच्यातर्फे खासदार निधीतून १० लक्ष रुपये मढी व सामाजिक सभागृह साठी दिलेले आहेत.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार कांशीराम पावरा,उदयोगपती चिंंतनभाई पटेल,कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया,जि.प सदस्य 
प्रा.संजय पाटील,माजी सरपंच महेंद्र राजपूत,मा.सरपच जितेंद्र राजपूत,रघुनाथ भोई,संपत भोई,काशिनाथ भोई,लोंडू भोई,रामदास भोई,देवनाथ भोई,दगा भोई,भगवान भोई,तालुका अध्यक्ष सुभाष भोई,तरुण गर्जना न्युज पेपर मुख्य संपादक संतोष भोई,रविद्र सोनवणे, लहू गुजर सरपंच भावेर, कवी लेखक निकवाडे सर, शिरपूर, ग्रामपंचायत सदस्य,भोई समाज बांधव, व नागरिक उपस्थित होते.

भोई समाज बांधवांची अनेक वर्षांपासून भोई समाजाचे कुल दैवत चौधारा माता मंदिर व सभा गृहची मागणी प्रलंबित होती. ती मागणी पूर्ण होत असल्याने भोई समाज बांधव यांच्या कडून आभार व्यक्त होत आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड सुनील भोई यांनी केले तर सूत्र संचालन प्रा बी पी राजपूत सर यांनी केले.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध