Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १ नोव्हेंबर, २०२०

भारताचे पहिले उप पंतप्रधान व गृहमंत्री सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त सरदार वल्लभभाई पटेल..! उन्नती मित्र मंडळ च्या वतीने भरवाडे येथे त्यांच्या स्मारकाला अभिवादन करून व रक्तदान करून जयंती उत्साहात साजरी..!


शिरपूर प्रतिनिधी:दि.३१/१०/२०२० रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त भरवाडे येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण व पूजन करून उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी शि.सा.का.व्हा.चेअरमन दिलीपभाई पटेल, पंचायत समिती सदस्य ममताबाई चौधरी,सरपंच भारतीबेन पटेल ,उपसरपंच योगिताबेन पटेल,पोलीस पाटील संजय चौधरी , ग्रा.पं सदस्य अनिताबेन पाटील,अविनाश पटेल,सुरेश पटेल,कृष्णा नगराळे तसेच सरदार वल्लभभाई पटेल उन्नती मित्र मंडळाचे युवा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. 
   
      
तसेच दर वर्षी प्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त सरदार वल्लभभाई पटेल उन्नती मित्र मंडळ तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तरी हे शिबिर स्व.मुकेशभाई पटेल ब्लड बँक च्या मदतीने घेण्यात आले. यावेळी गावातील ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.व सगळ्या रक्तदात्यांचे सरदार वल्लभभाई पटेल उन्नती मित्र मंडळ तर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच मुकेश पटेल ब्लड बँक च्या वतीने प्रशस्ती पत्र व सरदार पटेल यांची प्रतिमा भेट दिली.

यावेळी लॅब असिस्टंट शेखर पाटील, भाग्यश्री गीरासे,योगेश चौधरी,संजूबाबा पवार,पूजा इंगळे व मिलिंद पटेल,मनीष पाटील,प्रेम चौधरी,ललित पाटील, जयेश पाटील,हिमांशू पटेल,सागर चौधरी ,ललित चौधरी,मनोज चौधरी, जुगल पटेल,मनीष पटेल,निखिल पटेल, क्रिष्णा पटेल,प्रतिक पटेल, नयन पटेल,यश पटेल,मुकुंद पटेल,रोहित चौधरी,तन्मय पटेल,अक्षय पटेल व इतर सरदार वल्लभभाई पटेल उन्नती मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध