Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १ नोव्हेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
माजी मंत्री खडसे अपघातातून बचावले वाहनाचे फुटले टायर..! स्वीय सहाय्यक, बॉडीगार्ड व चालक सुखरूप..!
माजी मंत्री खडसे अपघातातून बचावले वाहनाचे फुटले टायर..! स्वीय सहाय्यक, बॉडीगार्ड व चालक सुखरूप..!
अमळनेर:प्रतिनिधी: माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे हे अमळनेर येथून परतीच्या प्रवासात जळगावकडे निघाले असताना त्यांच्या वाहनाचा धरणगावनजीक टायर फुटला मात्र चालकाने वाहनावर नियंत्रण मिळवल्याने अप्रिय घटना टळली.रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत खडसे यांच्यासह त्यांचा स्वीय सहाय्यक,बॉडीगार्ड व चालक बचावले असून त्यांना कुठलीही ईजा झाली नसल्याची स्वतः खडसे यांनी दिली.
अमळनेरहून परतताना वाहनाचे टायर फुटले गृहमंत्री अनिल देशमुख हे रविवारी सायंकाळी विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी अमळनेर येथे आले होते व या कार्यक्रमासाठी माजी मंत्री खडसेदेखील उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर परतीच्या प्रवासात खडसे हे वाहन (एम.एच.19 सीई 19) ने जळगावकडे येत असताना धरणगाव-जळगाव रस्त्यावरील महामार्गावर पुढील टायर अचानक फुटले व चालकाने परीस्थितीवर नियंत्रण मिळवत वाहन रस्त्याच्या कडेला नेले. सुदैवाने या अपघातात कुणालाही खरचटले नाही. या वाहनात माजी मंत्री खडसे यांच्यासह वाहन चालक, स्वीय सहाय्यक व बॉडीगार्ड असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा