Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०
परंडा येथे युवा स्पोर्ट्स अकॅडमीचे, मान्यवरांच्या हस्ते उदघाटन
परंडा (राहूल शिंदे) दि.16 दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बावची विद्यालय परंडा येथे युवा स्पोर्ट्स अकॅडमीचे उदघाटन करण्यात आले, ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ व क्रीडांगण उपलब्ध करून,मुलांच्या शारीरिक सुदृढतेवर भर देणे,राष्ट्रीय आंतराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करणे तसेच तळागाळातील खेड्यापर्यंत खेळाचे महत्व पटवून देणे हा उद्देश समोर ठेऊन युवा स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे युवराज देवकर यांनी बोलताना सांगितले.
माजी कृषी सभापती रणजितसिंह पाटील, बावची विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्रीरंग रोडगे तसेच बावची विद्यालयाचे क्रीडा शिक्षक नारायण खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडांगणाच्या कामकाजाची सुरुवात झाली, परंडा तालुक्यातील क्रीडा क्षेत्राचा विकास हा उद्देश समोर ठेऊन या ठिकाणी विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्रीरंग रोडगे, शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शीचे प्रा.डॉ.मार्कड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच तालुका क्रीडा संयोजक व उस्मानाबाद कबड्डी असोसिएशनचे सदस्य सचिन पाटील, परंडा वकील संघटनेचे अध्यक्ष अँड.विलास देवकर,पंचायत समिती सदस्य सतीश देवकर,
युवा स्पोर्ट्स अकॅडमी चे सचिव किरण बोबडे, उद्योजक शरद पवार,युवा स्पोर्ट्स अकॅडमी परंडा चे मुख्य प्रशिक्षक व स्पोर्ट्स डायरेक्टर प्रा.दीपक ओव्हाळ, कुस्ती प्रशिक्षक राम गोडगे, पुणे विद्यापीठ खेळाडू अजित मुळीक, वैभव ठोंबरे, क्रीडा शिक्षक-क्रिकेट कोच गोकुळ गोपाळघरे, सचिन मोरे, औरंगाबाद विद्यापीठ खेळाडू गणेश जाधव, सचिन मोरे, प्रकाश लोकरे,अतुल देवकर, गणेश देवकर,सुरेश दाखवले,अमर निमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा