Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०
परंडा येथे आ.सतीष चव्हाण यांची , सहविचार सभा संपन्न...
परंडा (राहूल शिंदे) दि.5 मराठवाडा पदवीधर मतदारसंघात 78 तालुके 10 हजार गावे असून या निवडणुकी साठी उस्मानाबाद जिल्ह्यात 72 मतदान केद्र व 2 सहाय्यक अशी एकूण 74 मतदान केंद्र निश्चित केली असून एकूण 33 हजार 67 मतदार आहेत. मराठवाड्यातील पदवीधर, वैद्यकीयशास्र ,रस्ते विकास , शिक्षण या विषयावर गेली दहा वर्ष प्रामाणिकपणे प्रयत्न केला असून पुढील काळात उर्वरित प्रलंबित प्रश्न नक्कीच सोडवू असे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आ.सतीष चव्हाण यांनी परंडा येथे सहविचार आयोजीत सभेत बोलताना सांगितले.
यावेळी माजी आ.राहूल मोटे,जि.प सदस्य दादासाहेब पाटील, नवनाथ जगताप, वकील बार असोसिएनचे अध्यक्ष अँड.विलास देवकर,श्रीकांत भालेराव, अँड.गोविंद कोटुळे, राष्ट्रवादी ता.अध्यक्ष अँड.संदीप पाटील, दत्तात्रय पाटील, राष्ट्रवादी युवक ता.अध्यक्ष धनंजय पाटील, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे ता.अध्यक्ष सचिन पाटील , मुख्याध्यापक बिभिषण रोडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व पदवीधर मतदारांची उपस्थिती होती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा