Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १६ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील उपरपिंड येथे दशमान गोसावी समाजाच्या दफन भूमीसाठी जागा मंजूर करण्यासाठी..! दशमान गोसावी समाज विकास संस्थेतर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन..!
शिरपूर तालुक्यातील उपरपिंड येथे दशमान गोसावी समाजाच्या दफन भूमीसाठी जागा मंजूर करण्यासाठी..! दशमान गोसावी समाज विकास संस्थेतर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन..!
शिरपूर प्रतिनिधी:तालुक्यातील उपरपिंड येथे दशमान गोसावी समाजाच्या दफन भूमीसाठी जागा मंजूर करण्यासाठी दशमान गोसावी समाज विकास संस्थेतर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
दशमान गोसावी समाजाच्या परंपरेप्रमाणे व मठमदी परंपरेनुसार व्यक्ती मयत झाल्यावर त्याला अग्नीडागा न देता दफन करण्याची विधी आहे. तालुक्यातील उपरपिड गावातील गोसावी समाजाची वाढती लोकसंख्या विचारात घेता गोसावी समाजाच्या रुढिप्रमाण सध्या दफनभूमीची नितांत आवश्यकता आहे.
त्यासाठी गावठाण गट नं १२८ मध्ये ३० गुंठा ही शासकीय जागा दशमान गोसावी समाजाच्या दफनभूमी साठी मंजुर करण्यात येऊन त्याची ७/१२ वर नोंद कुरण्यात यावी, महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग, यांचे दि.१७ एाप्रिल, २००४ चे सर्व जिल्यांना प्रत्येक गावात दफनभूमीची व्यवस्थाचे करणेबाबत महाराष्ट्र शासन यांचे लेखी पत्र यापूर्वीच सर्व जिल्ह्यांना शासनाने दिले आहेत. तरी वरील नमुद शासन निर्णय तरतूदीचा विचार करुन तात्काळ दफनभूमीची जागा मंजूर करण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याप्रसंगी दशनाम गोसावी समाज विकास संस्थेचे सहसचिव रामेश्वर गोसावी,विनय गोसावी,जीवन गोसावी, लक्ष्मण गोपाळ,सुरत दशनाम गोसावी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गोसावी,समाधान काशीगीर गोसावी, सुकागीर गोसावी, सोमागीर गोसावी,हेमंत गोसावी,किरण गोसावी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा