Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

सौ.मंजूषा चव्हाण-पाटील यांना, ''महाराष्ट्र दर्पण कृतज्ञता पुरस्कार'' जाहीर...



उमरगा(राहूल शिंदे) दि.12 येथील जिजाऊ ब्रिगेड प्रमुख सौ. मंजुषा चव्हाण-पाटील यांना आंतरराष्ट्रीय हक्क दिना निमित्त महाराष्ट्रातील विकासाकरिता कार्यरत असणाऱ्या स्री-पुरुषांना जय महाराष्ट्र पत्रकार,वृत्तपत्र लेखक व कवी महासंघ यांच्यावतीने,
'' महाराष्ट्र दर्पण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार 2020'' जाहीर झाला असून दि. 13.12. 2020 रोजी मुंबई येथे हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. ताई तुम्हाला पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!

मंजुषा चव्हाण-पाटील यांचे माहेर मुळगाव अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली (आपेट) येथे आहे . त्या बऱ्याच वर्षांपासून आरोग्यविषयक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांचा विवाह आळंद तालुक्यातील आळंगा येथील डॉ. प्रेमनाथ चव्हाण यांच्याशी झाला असून, लग्नानंतर ताईंनी समाजकार्याची दोरी आपल्या हाती घेतली व ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी कधी मोफत तर कधी अत्यल्प पैशावर त्यांनी पतीच्या साथीने महिलांना उत्तम आरोग्य देण्याचे काम चालू केले.
त्या स्वतः M.Sc B.ed, yoga and naturopathy & dietitian (योगा व निसर्गोपचार व आहार तज्ञ) असून त्यांचे पती डॉ. प्रेमनाथ विश्वनाथ चव्हाण हे आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

सद्या त्या जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका सचिव व विश्व जन आरोग्य समितीच्या उमरगा तालुका आरोग्य दुत पदावर कार्य करतात. त्याचबरोबर गरजू महिलांना आधार व आरोग्य देण्याचे काम करत आहेत.तसेच संसारातून आपल्या छोट्या बाळाला घरी सोडून,पतींचे मन सांभाळून त्या सामाजिक कार्याला वेळ देत आहेत.

आपल्या डॉक्टर पतीच्या मदतीने (वंध्यत्व) अपत्य नसलेल्या जोडप्यांना औषधोपचाराने कित्येक महिलांचे जीवन फुलविले, निसर्ग उपचार पद्धती ने मणक्यांच्या आजारावर पंचकर्म व अनेक रोगांवर सल्ला उपचार देतात.

सामाजिक कार्यात अग्रेसर असून कोरोणाच्या महामारी मध्ये गोरगरिबांना अन्नधान्य व मास्क वाटप केले आहे. महिला मध्ये साक्षरता आरोग्य विषयक सल्ला व व्यसनमुक्ती, महिलांवरील अन्याय याबद्दल मार्गदर्शन करतात.

जिजाऊ सावित्री अहिल्या यांच्या विचारांची ज्योत घेऊन सर्वसामान्य महिला पर्यंत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या घेऊन जात असतात. हजारो महिलांना स्वतःचे हक्क कर्तव्य याची जाणीव करून ते आपल्या व्याख्यानातून देत असतात.

त्या सातत्याने सांगतात महिलांनी स्वतःच्या या पायावर उभे राहिले पाहिजे. नवीन गोष्टी नवीन कौशल्य सातत्याने शिकलं पाहिजे म्हणजेच महिलाने आत्मनिर्भर बनले पाहिजे.असा त्या सामाजिक संदेश सातत्याने त्यांच्या बोलण्यातून देत असतात.

खरतर अभिमान वाटावा अशी गगनभरारी मंजुषा ताई चव्हाण यांची आहे. कमी काळात हजारो व्यक्तींना हक्काची ताई वाटणारी. प्रत्येकाला सहकार्य ,मार्गदर्शन, पेरणा त्या सातत्याने देत असतात. त्यांच्या एकंदरीत सामाजिक क्षेत्रातील व आरोग्य क्षेत्रातील कर्तव्यनिष्ठ भूमिका पाहून खरंच जिजाऊ, सावित्री, अहिल्या यांच्या विचारांच्या त्या खऱ्या वारसदार शोभतात. पुढेही ही अनंतकाळ त्यांचे सामाजिक कार्य व्यापक स्वरूपाने विस्तारित होत राहील.

खरतर मंजुषा ताई आज तालुक्यात पातळीवरती काम करतात. परंतु हे नेतृत्व लवकरच जिल्हा पातळीवर आणि प्रदेश पातळीवर पण अशा खंबीर , धाडशी महिला नेतृत्वाची गरज महाराष्ट्राच्या मातीला आहे . आजपासून दुर्गा महोत्सव चालू झालेला आहे.. अशाच कणखरपणे त्यांनी सामाजिक क्षेत्रात दुर्गा बनून सर्वसामान्य महिलांना न्याय द्यावा त्यांच्या न्यायासाठी लढा व्यापक स्वरूपात उभा करावा याच त्यांच्यासाठी खुप खुप सार्‍या शुभेच्छा.

या दैदिप्यमान यशाबद्दल विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या संस्थापक अध्यक्षा सौ.छायाताई भगत,धाराशिव जिल्हा समन्वयक सोमनाथ कोकाटे, परंडा तालुका आरोग्यदूत राहूल शिंदे यांनी भ्रमणध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध