Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १३ डिसेंबर, २०२०
लोक न्यायालयात तडजोड केल्याने मने जुळतात...!न्या. आर.एल. राठोड..!
रावेर दि. १२ (प्रतिनिंधी) येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात जिल्हासत्र न्यायाधीश यांचे आदेशानुसार दि. १२/१२/२०२० रोजी लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना न्या. राठोड बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, लोक न्यायालयात आपसातील वाद बाजुला ठेऊन तोडजोड केल्याने वादी व प्रतिवादी तसेच फिर्यादी व आरोपी यांना समान न्याय मिळतो दोघ पक्षकारांना मान्य असलेली तडजोड होते. त्यामुळे दुरावलेली मने पुन्हा जुळली जाताता म्हणुन जास्तीत जास्त नागरीकांनी लोक न्यायालयामध्ये तडजोड करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सुरुवातीला न्या. आर.एल.राठोड व न्या. आर.एम. लोळगे यांचे हस्ते सरस्वतीपुजन करुन लोक न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहा.ससरकारी अभीयोक्ता ॲङ प्रविण वारुळे यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले की, लोक अदालत कशासाठी आयोजित केली जाते व तीचा आपण कशा रितीने लाभ घेऊ शकतो याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी पो.नि. रामदास वाकोडे,स.पो.नि. शीतलकुमार नाईक,विस्तार अधीकारी महाजन, सौ. वर्षा प्रविण पाटील (पो. पाटील),रावेर तालुका वकिल संघाचे उपाध्यक्ष ॲङ जगदीश महाजन, सचिव ॲङ भास्कर डी. निळे, सहसचिव ॲङ धनराज पाटील, ॲङ योगेश गजरे,ॲङ सुभाष धुंदले, ॲङजितेंद्र दांडगे, व इतर मान्यावर वकिल मंडळी उपस्थीत होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲङ जितेंद्र दांडगे, यांनी तर आभार प्रदर्शन ॲङ भास्कर निळे यांनी केले.
लोकअदालतीत श्री. आर.एल. राठोड,अध्यक्ष तालुका विधी सेवासमिती व दिवाणी न्यायाधीश क.स्तर रावेर, श्री. आर.एम.लोळगे, सह.दिवाणी न्यायालयातील एकुण ठेवण्यात आलेले २४६ प्रलंबित प्रकरणापैकी एकुण खटल्यांचा निपटारा करण्यात आली. तसेच ग्रामपंचायतीचे,महाराष्ट्र विज वितरण कंपनीचे, भारत दुरसंचार निगमचे, बॅकेचे ठेवण्यात आलेले दाखलपुर्व एकुण ३२६४ प्रकरणापैकी एकुण ६४ प्रकरणे निकाली काढण्यात आले. त्यातुन तडजोड रक्कम रुपये २२८२९९ वसुल करण्यात झाली.
सदर लोकअदालतीचे पॅनल नंबर १ चे पंच सदस्य म्हणुन ॲङ दिपक एच. गाढे, व पॅरालिगल व्हालियटियर सौ. सुनिता डेरेकर , पॅनल नंबर २ चे पंच सदस्य म्हणुन ॲङ भास्कर डी.निळे, व रसुल हबीब तडवी यांनी काम पाहीले. न्यायालयीन कर्मचारी ए.एस. सुगधींवाले,(सहा.अधीक्षक), पी.एस. निंभोरे (व लिपीक),योगेश.एस. वैद्य(क लिपीक),ए.एस. सोनवणे (क लिपीक), के.बी. माने(व लिपीक), ङिएस. डिवरे(व लिपीक),एस.बी. जाधव(नाईक), बी.पी. चौधरी(शिपाई),किरण पाटील(शिपाई),यांनी सहकार्य केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा