Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १३ डिसेंबर, २०२०
शेगांव शहरातील पंचशील नगरातील गळफास घेतलेल्या विवाहितेचा अखेर मृत्यू..!
शेगाव :प्रतिनिधि (उमेश राजगुरे)येथील पंचशिलनगर परिसरातील रहिवासी टिना शरद बदेले या विवाहितेने 6 डिसेंबर रोजी स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र घटना घरच्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महिलेला वाचविण्याचा प्रयत्न केला.
पंरतू या घटनेत सदर महिला गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिच्यावर अकोला येथे उपचार सुरू होते. शेवटी काल 11 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान सदर विवाहितेचा मृत्यू झाला.
महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरच्यांनी शहर पो.स्टे.ला सासरच्या मंडळीविरूध्द तक्रार दिली असून फिर्यादी रेखा कैलास परवरे वय 37 रा. दिप बाजारसमोर, नांदेड कवठा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती शरद नंदलाल बदेले, गं.भा.बेबी नंदलाल बदेले, नणंद पारा सर्व रा.पंचशिल नगर शेगाव यांच्या विरूध्द कलम 304 ब, 498 अ, 504, 34 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा