Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १३ डिसेंबर, २०२०
खर्दे बुll येथे सिकलसेल तपासणी शिबीर...!
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग धुळे प्राथमिक आरोग्य केंद्र खर्दे अंतर्गत येणाऱ्या उंटावद येथील उपकेंद्रातील खर्दे बु येथे सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम सप्ताहाचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र खर्दे बु चे वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री सोमनाथ डी साळवे -आरोग्य सहाय्यक, श्री. कैलास बी फुलपगारे - आरोग्य सहाय्यक , श्रीमती वाहने ताई - आरोग्य सहाय्यीका यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
हे तपासणी अभियान दिनांक ११डिसेंबर पासून १७ डिसेंबर या कालावधीत राबविले जात आहे, तरी १ ते ३० वर्षाआतील व्यक्ती नी तपासणी करून घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. आरोग्य शिबीरात ३९ विद्यार्थी व १९ महिलांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरात श्रीमती आरोग्य सेविका रेखा पावरा, आरोग्य सेवक श्री. कोमल ठाकूर, आशासेविका श्रीमती सुनीता पाटील, आशासेविका श्रीमती संगीता चौधरी, यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी यांनी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा