Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

राज्यातील भूजलस्थानी असलेल्या मच्छीमारांचा सरकारने विचार करावा.



अमरावती प्रतिनिधी:सागरी मत्स्यमारांसाठी नुकसान भरपाईसाठी कमिटी गठित दिनांक ०९-१२-२०२०चा शासननिर्णय /भुजलाशी निगडित गोड्या पाण्यातील मत्स्यमारांसाठी का नाही?  लाॅकडाऊनमुळे गावबंदी, जिल्हाबंदी, आंतर राज्यबंदीमुळे मासेमारांना पूर्णपणे मासेमारी करता आलेली नाही आणि हे सत्य आहे. 

लाॅकडाऊन मधून मत्स्यव्यवसाय वगळण्यात आला असला तरी मत्स्यव्यवसाय निगडीत बर्फ,
मत्स्यवाहतूक,मच्छी विक्री मार्केट बंद अशा अनेक अडचणीमुळे मच्छिमार हा रोजगारापासून वंचितच राहिला त्यातुनच त्यांचे आर्थिक नुकसान झाले त्यातुनच मच्छी उत्पादनावर खुप मोठा परिणाम झाला अश्या अनेक अडचणीला मच्छिमार समोर गेला असून नुकसान भरपाई संदर्भात मत्स्य विभागाने मच्छीमारांचे बँक अकाउंट नंबर मागितला परंतु अजून पर्यंत नुकसान भरपाई ही त्यांना मिळालेली नाही आणि चालू वर्षाचा मासेमारी ठेका सुध्दा माफ केला नाही. हा अन्याय भूजल निगडीत गोड्या पाण्यातील मासेमारी करणाऱ्यावरच का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 
 
श्री वासुदेव सुरजूसे महाराष्ट्रातील मच्छीमारांचा हितचिंतक
सहकारी सदस्य : विस्तार व अविरत शिक्षणपरिषद महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर. महाराष्ट्र प्रदेश प्रमुख:
भारती मच्छिमार सहकारी संस्था प्रकोष्ठ महाराष्ट्रप्रदेश.


1 टिप्पणी:

  1. भोई समाजातील एकही वाली राजकीय पक्षांमध्ये (आमदार,खासदार)या पदस्थानी नसल्यामुळे माझा मच्छिमार भोई बांधव सतत अन्याय सहन करीत आलेला आहेनन नव्हे अन्यायाला बळी पडत आलेला आहे परंतु प्रत्येक काळरात्री नंतर आशेची पहाट होतच असते त्याप्रमाणे काही तारे भोई समाजात उदयास येत आहेत ,नक्कीच तो दिवस लवकरच उजाडेल व माझा भोई बांधव अन्यायातुन मुख्यतः होईल. डॉ.सातघरे

    उत्तर द्याहटवा

प्रसिद्ध